Advertisement

सोने खरेदीसाठी आता आधारकार्ड-पॅनकार्ड बंधनकारक

आधारकार्ड आणि पॅनकार्ड शिवाय देशातील कोणत्याही ज्वेलर्समध्ये तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही. केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सोने खरेदीसाठी आता आधारकार्ड-पॅनकार्ड बंधनकारक
SHARES

सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांची खरेदीसाठी आता आधारकार्ड आणि पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. आधारकार्ड आणि पॅनकार्ड शिवाय देशातील कोणत्याही ज्वेलर्समध्ये तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही. केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

केंद्रीय अर्थमंत्रालयाने २८ डिसेंबरला सोन्याच्या व्यापाराला PMLA (Prevention of Money Laundering Act) कायद्याच्या अखत्यारित आणल्याची अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे आता ईडीला कोणत्याही कागदपत्रांशिवाय सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची तपासणी करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीने उसळी घेतली होती. येत्या वर्षांत सोन्यीच किंमत ६३ हजार प्रतितोळा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोने, चांदी खरेदीसाठी पॅनकार्ड आणि आधारकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची आता देशभरातील सराफा व्यापाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. 

या आदेशानुसार आता पेढी आणि सोने व्यापाऱ्यांना १० लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसंच आगामी काळात सोने-चांदीच्या दागिने खरेदीसाठी आर्थिक व्यवहारांप्रमाणे KYC सादर करावे लागण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मध्य रेल्वेच्या स्थानकांत फेब्रुवारीपासून ई-बाईक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा