अलाहाबाद बँकेच्या बाहेर ग्राहकांची हाणामारी

वांद्रे - वांद्रे पश्चिमेतल्या अलाहाबाद बँकेसमोर ग्राहकांनी एकमेकांना काठ्यांनी मारझोड केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. रांगेत उभं राहण्याच्या कारणावरून दोन ग्रुप आपसात भिडले. रांगेच्या बाहेर असलेल्या गौतम या युवकानं हा हाणामारीचा व्हीडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. विशेष म्हणजे घटना घडली त्यावेळी पोलीस नसल्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला. गौतमच्या म्हणण्यानुसार काही जणांनी एका ज्येष्ठ नागरिकाशी गैरवर्तन केलं आणि नंतर काठ्या घेऊन हाणामारीही केली. 1000-500 च्या नोटा बंद झाल्यामुळे नोटा बदलण्यासाठी ग्राहकांनी बँकांमध्ये धाव घेतली. बँकेच्या बाहेर 3 ते 4 तास उभं राहवं लागलं यामुळे ग्राहक वैतागले आणि त्यातूनच हा प्रकार घडला, असं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. 

Loading Comments