बँक ग्राहकांनी भीतीपोटी १५ दिवसांत काढले ५३ हजार कोटी

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लाॅकडाऊन आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

बँक ग्राहकांनी भीतीपोटी १५ दिवसांत काढले ५३ हजार कोटी
SHARES

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लाॅकडाऊन आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांनी मागील 15 दिवसात बँकांमधून तब्बल 53 हजार कोटी रुपये काढले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, गेल्या १५ दिवसांत लोकांनी काढलेल्या रकमेचा आकडा ५३ हजार कोटी रुपये आहे. हा आकडा १६ महिन्यांतील उच्च स्तर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैस केवळ सण व निवडणुकीवेळी काढले जातता. १३ मार्चपर्यंत लोकांकडे एकूण २३ लाख कोटी रुपये चलन होते. अर्थतज्ञांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल ट्रान्झॅक्शन वाढले असले तरी आपत्कालीन स्थितीमुळे लोकांमध्ये सतर्कता आणि भीती वाढली आहे. त्यामुळेच लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे काढले आहेत.

 लॉकडाऊनमध्ये बहुतांश अत्यावश्यक वस्तूंची खरेदी वाढली आहे. त्यामुळे लोकांना अधिक पैशाची गरज पडत आहे. सध्याच्या स्थिती आपण बँकेत किंवा एटीएमपर्यंत जाऊ शकू का,अशी लोकांना शंका होती. त्यामुळे सतर्कता बाळगत लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढले. बँक ऑनलाइन व्यवहारास प्रोत्साहन देत आहेत, मात्र फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी डिलिव्हरी सेवा मर्यादीत केली. लोक ऑफलाइन खरेदी करत आहेत. त्यामुळे रोकडची आवश्यकता पडते. किराणा सामान व अन्य वस्तू स्थानिक दुकानदाराकडून घेत आहेत.हेही वाचा -

भीतीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल

Bombay IITकडून अॅपची निर्मिती, 'क्वॉरन्टाईन' व्यक्तींवर ठेवणार लक्ष
संबंधित विषय