नोटबंदीचा परिणाम डॉगफूड व्यवसायावर

 Tardeo
नोटबंदीचा परिणाम डॉगफूड व्यवसायावर

ताडदेव - येथील रतन टाटा रोडवरील डॉगी आर्टिकल हे दुकान श्वानमालकांमध्ये सुपरिचित आहे. नोटबंदीमुळे आमच्या व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचं व्यवस्थापक संदीप हिर्लेकर यांनी म्हटलंय.

या दुकानातून क्रेडिट-डेबिट कार्ड वापरून खरेदी करता येते. तसंच चेकही स्वीकारले जातायत. पण दोन हजाराची नोट घेऊन येणाऱ्यांना सुट्टे पैसे देताना पंचाईत होतेय, असं हिर्लेकर यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की, आमच्या मुंबईत चार शाखा आहेत. एका शाखेत विक्री कमी झाली तरी, त्याचा प्रभाव व्यवसायावर होतो. एखाद्याला फारच गरज असेल तर आम्ही तडजोड करतो, पण अशी तडजोड नेहमीच करता येत नाही.

Loading Comments