Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ

कोरोना काळात १५ वर्षांपेक्षा कमी किंमतीवर कच्च्या तेलाचे दर गेले आहेत. मात्र, आता लवकरच कोरोना लस येण्याची शक्यता असल्याने कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ
SHARES

मंगळवारी पेट्रोल, डिझेल सलग पाचव्या दिवशी महागले आहे. सरकारी पेट्रोलिअम कंपन्यांनी  पेट्रोलचे दर ६ पैशाने तर डिझेलचे दर १६ पैशाने वाढवले आहेत.  आता मुंबईत पेट्रोल ८८.२९ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ७७.९० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

कोरोना काळात १५ वर्षांपेक्षा कमी किंमतीवर कच्च्या तेलाचे दर गेले आहेत. मात्र, आता लवकरच कोरोना लस येण्याची शक्यता असल्याने कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. २०२१ मध्ये ओपेक देशांचे लक्ष्य काय असेल हे ठरविण्यासाठी ३० नोव्हेंबर, १ डिसेंबरला बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर ४० वरून ४५ डॉलरवर पोहोचले आहेत. त्यामुळे मागील आठवड्यापासून देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढू लागल्या आहेत.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र सप्टेंबरपासून किंमती वाढविणे बंद करण्यात आले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती २० डॉलरवर आल्या होत्या. दीड महिन्यांपूर्वी  पेट्रोल, डिझेलच्या दरात १.१९ रुपयांची घट झाली होती. यानंतर ४८ दिवस किमती वाढल्या नव्हत्या. आता पुन्हा किमती वाढू लागल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच दिवसांत पेट्रोल ५३ पैशांनी महाग झाले आहे, तर डिझेलच्या किंमतीत ९५ पैशांची वाढ झाली आहे.हेही वाचा -

महाराष्ट्र : २०२० मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

यंदा भाडेवाढ न करण्याचा बेस्टचा निर्णयRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement