Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, मुंबईत इतके आहेत दर

पेट्रोलचा दर परवडत नसल्यानं गाड्या बाहेर काढायच्या की नाही? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, मुंबईत इतके आहेत दर
SHARES

देशभरात पेर्टोल आणि डिझेलचे (Petrol and Diesel) दर गगनला भिडत आहेत. मुंबईत पेट्रोलचा सोमवारचा दर ९५.४६ तर डिझेलचा दर ८६.३४ इतका आहे. गेल्या २४ तासांत पेट्रोल २५ आणि डिझेल ३० पैशांनी महागले आहे. तर पॉवर पेट्रोलचा दरही ९८.२४ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

प्रीमियम पेट्रोलचा दर शंभरीपार गेल्यानं पेट्रोल पंपचालकांना एका नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. राज्यात अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर अजूनही जुन्याच मशीन्स वापरल्या जात आहेत.

या मशिन्समध्ये तीन अंकी किंमत दर्शविण्याची सुविधा नसल्यामुळे (१०० पेक्षा जास्त) पंपचालकांना पेट्रोल विक्री थांबवावी लागली. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि राजस्थानात प्रीमियम पेट्रोलचा दर १०० रूपयांच्या पुढे गेला आहे.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.


आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याचवेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP ९२२३११२२२२ आणि एचपीसीएल ग्राहक यांना ९२२२२०११२२ संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.



हेही वाचा

तांब्यामुळे विद्युत तारा आणि इलेक्ट्रिक उपकरणं महागणार

पुढील आठवड्यात ३ दिवस बँका बंद, संपामुळे कामकाज होणार ठप्प

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा