पेट्रोलचे दर पुन्हा वाढले

Mumbai  -  

महाराष्ट्रात पेट्रोलचे दर तीन रुपयांनी वाढवण्यात आले आहे. राज्य सरकारने व्हॅटमध्ये वाढ केली. त्यामुळे मुंबईत आता पेट्रोलचे दर 77 रुपये 45 पैसे इतके झाले आहेत. शुक्रवारी रात्री 74 रुपये 50 पैसे प्रतिलीटर अशी किंमत होती. वाहनचालकांनी यावर आपला रोष व्यक्त केला आहे. 

मुंबईत सार्वजनिक वाहन व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना दोन किंवा चारचाकी वाहनांशिवाय प्रवास करू शकत नाही. ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी वाहनचालक करतात. अनेकांनातर पेट्रोलची भाववाढ झाली हेही माहीत नव्हते. पेट्रोलपंपावर आल्यावरच ही माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया या वाहनचालकांनी दिली.

Loading Comments