Advertisement

मुंबईत पेट्रोलचा भाव १०० रुपयांच्या जवळ, इंधनांच्या दरांमध्ये पुन्हा वाढ

मुंबईत आता पेट्रोलचा भाव प्रतिलिटर १०० रुपयांच्या जवळ गेला आहे. दरवाढ अशीच चालू राहिली तर एक ते दोन दिवसांमध्ये दर १०० रुपयांच्या वर गेलेले असतील.

मुंबईत पेट्रोलचा भाव १०० रुपयांच्या जवळ, इंधनांच्या दरांमध्ये पुन्हा वाढ
SHARES

देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (diesel) ची दरवाढ सुरूच आहे. मंगळवारी पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महागलं आहे. मुंबईत आता पेट्रोलचा भाव प्रतिलिटर १०० रुपयांच्या जवळ गेला आहे. दरवाढ अशीच चालू राहिली तर एक ते दोन दिवसांमध्ये दर १०० रुपयांच्या वर गेलेले असतील. 

मुंबईत आता पेट्रोल (Petrol) ९९. ७५ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल (diesel) ९१.५७ रुपयांना मिळत आहे. नाशिकमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरीचा आकडा गाठला आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १००.१९ रुपये आणि डिझेलचे दर ९०.६३ रुपयांवर पोहोचले आहेत. तर परभणीमध्ये पेट्रोल १०२.०९ रुपये आणि डिझेल ९२.४६ रुपये प्रतिलिटर दराने विकलं जात आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९३.४४ रुपये आणि डिझेलची किंमत ८४.३२ रुपये झाली आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९५.०६ रुपये तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९३.४९ रुपये झाला आहे.

सोमवारी इंधन दर स्थिर होते तर रविवारी पेट्रोल १७ पैसे आणि डिझेल २७ पैशांनी महागले होते.तर शनिवारी इंधन दरात कोणताही बदल झाला नाही. त्याआधी शुक्रवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात १९ पैसे वाढ केली होती. तर डिझेल दरात २९ पैशांची वाढ केली होती.

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एका महिन्यात आतापर्यंत दरवाढ होण्याची ही तेरावी वेळ आहे.

देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.

या वर्षात ३१ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. तर ४ वेळा किंमती कमी झाल्या आहेत. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत.



हेही वाचा - 

आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती

COVID 19 रुग्ण शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, अभ्यासातून उघड

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा