Advertisement

पेट्रोलच्या किंमती १२१ रुपये लीटर होणार?

कच्च्या तेलाच्या किमतीनं प्रति बॅरल १२० डॉलर ओलांडले आहेत.

पेट्रोलच्या किंमती १२१ रुपये लीटर होणार?
SHARES

सर्व सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागण्याची शक्यता आहे. ७ मार्चनंतर इंधनाच्या दरात १२ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासह पेट्रोल १२१ रुपये प्रति लिटर होऊ शकते. याचं मुख्य कारण म्हणजे गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीनं प्रति बॅरल १२० डॉलर ओलांडले आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती दररोज वाढत आहेत. गुरुवार नंतर, शुक्रवारी थोडीशी घसरण झाली आणि ते प्रति बॅरल १११ डॉलरवर राहिले. दुसरीकडे देशातील पाच राज्यांतील निवडणुकीचे वातावरण असल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या आधारावर तेल कंपन्यांना किमान १२ रुपयांनी दरात वाढ करावी लागू शकते. असं झाल्यास काही राज्यांमध्ये पेट्रोल १२१ रुपयांच्या पुढे जाईल आणि डिझेल ११० रुपयांच्या पुढे जाईल. आंतरराष्ट्रीय किमतींच्या आधारे भारतात इंधनाचे दर दररोज सकाळी निश्चित केले जातात.

३ मार्च रोजी कच्च्या तेलाच्या किमती २०१२ नंतर प्रथमच १२० डॉलरपर्यंत गेल्या. नोव्हेंबरमध्ये त्याची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर होती. याचा अर्थ त्यात ५०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ४ मार्च रोजी दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये तर मुंबईत १०९.९ रुपये होते.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी ७ मार्चला मतदान होणार आहे. त्याचा निकाल १० मार्चला लागणार आहे.

ICICI सिक्युरिटीजनं म्हटलं आहे की, ऑटो इंधनाच्या मार्केटिंगसाठी ३ मार्चपर्यंत मार्जिन मायनस ४.९२ रुपये प्रति लिटर होते, तर चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपासून म्हणजेच जानेवारीपासून ते १.६१ रुपयांनी कमी आहे.



हेही वाचा

मध्यप्रेमींना झटका; बीअरच्या किमती वाढणार?

रशिया-युक्रेन वादाच भारतावर काय होईल परिणाम?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा