Advertisement

पेट्रोलचे दर पुन्हा वाढले

दोन दिवस विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. डिझेलचे दर मात्र स्थिर ठेवले आहेत.

पेट्रोलचे दर पुन्हा वाढले
SHARES

दोन दिवस विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. डिझेलचे दर मात्र स्थिर ठेवले आहेत. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत आता पेट्रोलचा भाव १०५.२४ रुपये झाला आहे. तर डिझेल ९६.७२ रुपयांना मिळत आहे. 

गेले दोन दिवस भाव स्थिर होते. मात्र,शुक्रवारी पेट्रोलचे भाव पुन्हा वाढले. मंगळवारी  पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल २८ पैशांनी महागलं होतं. तर सोमवारी दरांमध्ये वाढ झालेली नव्हती. 

गेल्या काही दिवसांत पेट्रोलच्या दराने शंभरी गाठल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे दरही आता शंभरी गाठताना दिसत आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ९९.१६ रुपये तर डिझेलचा दर ८९.१८ रुपये आहे. 

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर ४ मे पासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात एकूण ३३ वेळा वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात ३३ वेळा वाढ झाली. 

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. 

मार्च महिन्यात १६ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर मे महिन्यात सलग ४ दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत. 

सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर ३२.९८ प्रतिलिटर तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रतिलिटर कर आकारत आहे. तर महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि डिझेलवर २१ टक्के व्हॅट लावते. तसंच यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर १० रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवर ३ रुपये प्रतिलिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.



हेही वाचा -

  1. पॅन कार्ड हरवलंय, खराब झालंय? असं मिळवा नवीन पॅन कार्ड

  2. रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा