• पेट्रोल बंद?
  • पेट्रोल बंद?
SHARE

मुंबई - राज्यातील पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोल-डिझेल कंपनीकडून तीन आणि चार नोव्हेंबरला पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेल पंपामध्ये तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल खरेदीच न केल्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होणार आहे. तीन आणि चार तारखेला पंपामध्ये जेवढा साठा शिल्लक आहे, तेवढाचा साठा विक्रीकरून पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल कंपन्या पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून तसेच त्यांना मिळत असलेल्या कमिशनमध्येही वाढ करण्यास नकार देत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं पेट्रोल डिलर्स असोशियनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या