Advertisement

इंधन दरवाढ सुरूच, अनेक शहरांमध्ये पेट्रोलचा भाव १०० रुपयांच्या वर

राज्यातील बऱ्याच शहरांमध्ये पेट्रोलचे भाव १०० रुपयांच्या वर गेले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून तरीही इंधनांच्या दरात वाढ सुरूच आहे.

इंधन दरवाढ सुरूच, अनेक शहरांमध्ये पेट्रोलचा भाव १०० रुपयांच्या वर
SHARES

महिनाभरापासून सुरु असलेल्या इंधन दरवाढीने वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. राज्यातील बऱ्याच शहरांमध्ये पेट्रोल (petrol) चे भाव १०० रुपयांच्या वर गेले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून तरीही इंधनांच्या दरात वाढ सुरूच आहे. सोमवारीही पेट्रोल आणि डिझेल (diesel) च्या दरात वाढ झाली आहे. 

देशभरात पेट्रोल (petrol) दर प्रतिलिटर २५ ते ३१ पैशांनी महागले आहे. तर डिझेल (diesel) चा दर २५ ते २९ पैशांनी वाढला. इंधन दरवाढीचा मे महिन्यातील हा १७ वा दिवस आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव १००.५३ रुपये झाला आहे.  तर मुंबईत डिझेलचा दर ९२.५० रुपये एवढा आहे.

मुंबई, पुण्यासह इतर शहरांत पेट्रोलच्या दराने शतक गाठले आहे.  पुणे शहरात पेट्रोलचा दर हा शंभरच्या पुढे गेला आहे. पुण्यात पेट्रोलचा दर ३४ पैशांनी वाढला आहे. सध्या पुणे शहरात पेट्रोल प्रतिलिटर १००.१५ रुपयांना मिळत आहे. तर डिझेलचा दर हा ९०.७१ रुपये झाला आहे. 

महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे भाव १०० रुपयांच्या वर गेले आहेत. अमरावती, औरंगाबादमध्ये , भंडारा, बुलढाणा, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, नंदुरबार, उस्मानाबाद, रत्नागिरी, सातारा, सोलापर, वर्धा, वाशीम, ठाणे, मुंबई या शहरांमध्ये आता पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. 

४ मे पासून देशात इंधन दरवाढ सातत्याने सुरू आहे. मे महिन्यात आतापर्यंत पेट्रोल प्रतिलिटर ३.८८ रुपयांनी तर डिझेल ४.४२ रुपयांनी महाग झालं आहे. जानेवारीपासून आतापर्यंत मुंबईत पेट्रोलचा भाव ११ टक्क्यांनी तर डिझेलचा भाव १४ टक्क्यांनी वधारला आहे.

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.

जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत.



हेही वाचा -

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; पाहा काय बंद काय सुरू?

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पुढे यावे- मुख्यमंत्री

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा