Advertisement

PMC बँक घोटाळा: ‘एचडीआयएल’चे प्रवर्तक सारंग, राकेश वाधवा यांना अटक

पीएमसी बँकेतील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी दोघांनाही बोलवलं होतं. परंतु चौकशीला सहकार्य न केल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात आली.

PMC बँक घोटाळा: ‘एचडीआयएल’चे प्रवर्तक सारंग, राकेश वाधवा यांना अटक
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅप बँके (PMC) तील घोटाळ्याप्रकरणी 'इकाॅनाॅमिक आॅफेंस विंग' (आर्थिक गुन्हे शाखा) च्या पोलिसांनी हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) कंपनीचे प्रवर्तक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांना अटक केली आहे. 

'अशी' झाली अटक

पीएमसी बँकेतील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी दोघांनाही बोलवलं होतं. परंतु चौकशीला सहकार्य न केल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. बांधकाम क्षेत्रातील ‘एचडीआयएल’ या दिवाळखोरीत गेलेल्या कंपनीला पीएमसी बँकेने नियमबाह्य पद्धतीने ६५०० कोटी रुपयांचं कर्ज दिल्याची कबुली बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जाॅय थाॅमस यांनी दिली होती.

चारपट कर्ज

बँकेचे एकूण कर्ज वाटप ८८८० कोटी रुपयांचं अजून त्यापैकी चारपट कर्ज बँकेने एचडीआयएल या एकाच कंपनीला दिल्याचं यातून पुढं आलं. संचालक मंडळातील एका संचालकाने बँकेतील ताळेबंदाची खरी प्रत रिझर्व्ह बँके (RBI)ला गुप्तपणे पाठवल्यावर हे प्रकरण समोर आलं.

सद्यस्थितीत पीएसी बँकेच्या खातेधारकांनी पीएमसी बँकेच्या व्यवस्थापकांविरोधात सायन पोलिसांत गुन्हा नोंदवला असून मुंबई उच्च न्यायालयात आरबीआयविरोधात रिट याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.  



हेही वाचा-

PMC बँकेविरोधात पोलिसांत तक्रार

PMC बँकेचे ठेवीदार RBI विरोधात आझाद मैदानात करणार आंदोलन



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा