
भारतीय रिझर्व्ह बँकेनं पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (PMC Bank) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेचे ग्राहक आता १ लाखांपर्यंत रक्कम बँकेतून काढू शकणार आहेत. या आधी ही मर्यादा ५० हजारांपर्यंत होती. असं असलं तरी बँकेवरचे निर्बंध पूर्वीसारखेच राहणार असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. डिसेंबर २०२० पर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.
रिझर्व्ह बँकेनं पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर ६ महिन्यांसाठी निर्बंध घातले होते. आता पुन्हा एकदा सहा महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. या बँकेच्या खातेदारांची खाती गोठवण्यात आली. त्यानंतर या बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
RBIच्या या निर्णयामुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. बँकेतल्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचं सांगत ६ महिने सर्व व्यवहारांवर निर्बंध घातल्याचं RBIने पत्रात म्हटलं होतं. या कारवाईमुळे PMC बँकेला नवी कर्ज देता येणार नाही, तसंच ठेवी स्वीकारता येणार नाही.
हेही वाचा
