Advertisement

युनियन बँकेचं कर्ज ०.१० टक्क्यांनी स्वस्त

युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जांवरील व्याजदरात पुन्हा एकदा कपात घोषित केली आहे.

युनियन बँकेचं कर्ज ०.१० टक्क्यांनी स्वस्त
SHARES

युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जांवरील व्याजदरात पुन्हा एकदा कपात घोषित केली आहे. एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट्स) आधारित कर्जांवरील व्याजदर बँकेने ०.१० टक्क्यांनी (१० बेसिस पॉइंट्स) घटवले आहेत. यामुळे एमसीएलआर आधारित एक दिवसाच्या मुदतीच्या कर्जाचा व्याजदर आता ७.०५ टक्के झाला आहे. 

एक महिना, तीन महिने व सहा महिने मुदतीच्या कर्जांवरील नवे व्याजदर अनुक्रमे ७.१५, ७.३० व ७.४५ टक्के असतील. एक वर्षे मुदतीच्या ग्राहक कर्जांसाठी आता ७.६० टक्के व्याजदर असेल. नवे दर ११ जूनपासून लागू करण्यात आल्याचे बँकेने सांगितलं आहे. जुलै २०१९ पासून बँकेने घोषित दरात ही सलग १२ वी कपात आहे.

यापूर्वी याच महिन्यात युनियन बँक ऑफ इंडियाने एक्स्टर्नल बेंचमार्क लिंक्ड लेंडिंग रेट (ईबीएलआर) ला ४० बेसिस पॉइंट्सनी कमी केला होता. म्हणजेच ७.२० टक्क्यांनी कपात करून ६.८० टक्के केला होता.

हेही वाचा - नीरव मोदीची 'इतकी' कोटींची मालमत्ता होणार जप्त

याआधी भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर आधारित कर्जदरात (एमसीएलआर) ०.२५ टक्क्याची कपात केली आहे. त्यामुळे बँकेचे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे. तसंच सध्या असलेल्या कर्जदार ग्राहकांचा ईएमआय घटणार आहे. नवे व्याजदर १० जूनपासून लागू झाले आहेत.

आरबीआयने काही दिवसांपूर्वी रेपो दर कपात करून बँकांसाठी आपलं कर्ज स्वस्त केलं आहे. या कपातीचा फायदा आता एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिला आहे. सलग तेरा वेळा एसबीआयने एमसीएलआर दरात कपात केली आहे. यामुळे गृह, वाहन कर्जाचा व्याजदर कमी होणार आहे. एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क लिंक लेंडिंग रेट (ईबीआर) आणि रेपो रेट लेंडिंग रेटमध्ये (आरआरएलआर) ०.४० टक्क्याची कपात केल्याने ईबीआर ६.६५ टक्के झाला आहे. तर रेपो रेट लेंडिंग रेट ६.२५ टक्के झाला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा