Advertisement

एसबीआयचं कर्ज झालं स्वस्त

भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर आधारित कर्जदरात (एमसीएलआर) ०.२५ टक्क्याची कपात केली आहे.

एसबीआयचं कर्ज झालं स्वस्त
SHARES

 भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर आधारित कर्जदरात (एमसीएलआर) ०.२५ टक्क्याची कपात केली आहे. त्यामुळे बँकेचे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे. तसंच सध्या असलेल्या कर्जदार ग्राहकांचा ईएमआय घटणार आहे. नवे व्याजदर १० जूनपासून लागू होतील.

आरबीआयने काही दिवसांपूर्वी रेपो दर कपात करून बँकांसाठी आपलं कर्ज स्वस्त केलं आहे. या कपातीचा फायदा आता एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिला आहे. सलग तेरा वेळा एसबीआयने एमसीएलआर दरात कपात केली आहे. यामुळे गृह, वाहन कर्जाचा व्याजदर कमी होणार आहे. एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क लिंक लेंडिंग रेट (ईबीआर) आणि रेपो रेट लेंडिंग रेटमध्ये (आरआरएलआर) ०.४० टक्क्याची कपात केल्याने ईबीआर ६.६५ टक्के झाला आहे. तर रेपो रेट लेंडिंग रेट ६.२५ टक्के झाला आहे.

३० वर्षांच्या मुदतीचे २५ लाखांचे गृहकर्ज असल्यास एमसीएलआर कर्जदरावर आधारित असल्यास कर्जदाराची दरमहा ४२१ रुपयांची बचत होणार आहे. या अगोदर मे महिन्यात देखील बँकेने एमसीएलआर दरात ०.१५ टक्क्याची कपात केली होती. या कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता ७ टक्के झाला आहे. सर्व मुदतीच्या कर्जाच्या दरात ०.२५ टक्क्याची कपात करण्यात आली आहे. एसबीआयचा बेस रेट ७.४० टक्के करण्यात आला आहे.



हेही वाचा -

राज्यात २५५३ नवीन रुग्णांची नोंद, तर दिवसभरात १०९ जणांच्या मृत्यूची नोंद

कोरोनाने मृत्यू झाल्यास मुंबई महापालिका कामगारांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा