Advertisement

एसबीआयची 'ही' सुविधा २१ जूनला बंद

बँक काही अॅप्लिकेशन्ससाठी काही नवीन प्रणाली लागू करत आहे.त्यामुळे एक महत्त्वाची सेवा बंद राहण्याची शक्यता आहे.

एसबीआयची 'ही' सुविधा २१ जूनला बंद
SHARES

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑनलाइन व्यवहारामध्ये मागील काही दिवसांपासून समस्या येत होती. त्यामुळे बँक काही अॅप्लिकेशन्ससाठी काही नवीन प्रणाली लागू करत आहे. परिणामी एसबीआयची ऑनलाइन सर्व्हिस २१ जून २०२० रोजी बंद राहण्याची शक्यता आहे. एसबीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

एसबीआयने ट्विटमध्ये म्हटलं की, बँकेच्या काही अॅप्लिकेशन्ससाठी आम्ही काही नवीन प्रणाली लागू करत आहोत. त्यामुळे २१ जून रोजी आमच्या ऑनलाइन सुविधा बंद राहू शकतात. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी त्यानुसार प्लॅन आखावा.

एसबीआयची ऑनलाइन सुविधा १३ आणि १४ जून रोजी व्यवस्थित काम करत नव्हती. काही ग्राहकांनी यासंदर्भात ट्विटरवरून तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर एसबीआयने त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून अनेक ग्राहकांना रिप्लाय देखील केले होते. त्यावेळी ही समस्या लवकरच सोडवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं.

एसबीआयच्या एका ग्राहकाने तक्रार केली होती की, १३ जून सकाळपासूनच बँकेचे व्यवहार ऑनलाइन प करण्यास अडचण येत आहे. काही ग्राहकांनी अशी तक्रार केली की पेटीएम, यूपीआय, योनो एसबीआय अॅप, इंटरनेट बँकिंग या माध्यमातून व्यवहार करता येत नाहीत. तर खात्यातील रक्कम देखील ऑनलाइन चेक करता येत नव्हती. काही वेळानंतर एसबीआयने त्यांची सेवा पूर्ववत झाल्याची माहिती दिली. 



हेही वाचा -

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

Coronavirus Updates : यंदा पदवी परीक्षा होणार नाहीत?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा