Advertisement

पीएनबीची नॉन ईएमव्ही एटीएममधून व्यवहारास बंदी

पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) खाते असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएनबीने खातेदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी १ फेब्रुवारीपासून आपल्या नियमात काही बदल केले आहेत.

पीएनबीची नॉन ईएमव्ही एटीएममधून व्यवहारास बंदी
SHARES

पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) खाते असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएनबीने खातेदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी १ फेब्रुवारीपासून आपल्या नियमात काही बदल केले आहेत. यानुसार पीएनबीच्या डेबिट कार्डधारकांना नॉन ईएमव्ही एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत. तसंच त्यांना आपल्या खात्यातील बॅलन्सही तपासता येणार नाही. 

पीेएनबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये बँकेने म्हटलं की,  क्लोनिंग कार्डद्वारे बँकेच्या कार्डधारकांची एटीएममधून फसवणूक केली जाते. त्यांची फसवणूक टाळण्यासाठी नॉन ईएमव्ही एटीएममधून कोणतेही व्यवहार करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार मॅग्नेट्राईप कार्ड यापूर्वी बंद करण्यात आली आहेत. त्यांच्या जागी ईएमव्ही चीप असलेली कार्ड आली आहेत. ती अधिक सुरक्षित आहेत. नॉन ईएमव्ही एटीएम मशीनमध्ये व्यवहार पूर्ण होईपर्यंत हे कार्ड बाहेर काढता येत नाही. त्यावर रिडींग सुरू असते. त्यामुळे खातेदारांची फसवणूक होण्याचा धोका कमी आहे. 

नॉन ईएमव्ही एटीएम म्हणजे ज्यामध्ये व्यवहारावेळी कार्ड ठेवले जात नाही. यामध्ये मॅग्नेटिक स्ट्रीपच्या माध्यमातून डेटा रीड केला जातो. ईएमव्ही एटीएम मशिन्समध्ये कार्ड काही सेकंड्ससाठी लॉक होतं.हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू होणार सीबीएसई बोर्ड

महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसवर सीसीटीव्हीची नजरRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा