Advertisement

पोलीस काका हे वागणं बरं नव्हं!


SHARES

कुरार - पोलीस हे जनतेचे सेवक असतात. मात्र अशा पोलिसामुळे अख्य पोलीस खातं बदनाम होतंय. व्हिडिओमधील पोलिसाचं संभाषण नीट ऐका.. एकीककडे जनता तासनतास बँकांच्या बाहेर,एटीएमच्या रांगांमध्ये ताटकळत असताना काही जण आपल्या वर्दीचा गैरफायदा घेताना दिसतायेत. असाच काहीसा प्रकार मुंबईमध्ये पाहायला मिळाला. एटीएमच्या बाहेर रांग असतानाही कुरार पोलीस ठाण्यातील हवालदार जबरदस्ती पैसे काढण्यासाठी आतमध्ये घुसला. एवढंच नाही तर विरोध करणाऱ्यांशी अरेरावीची भाषा देखील करू लागला. कायदा सुव्यस्थेची भाषा करणारेच जेव्हा अशी अरेरावीची आणि दंडुकेशाहीची भाषा करतात तेव्हा कुठे नेऊन ठेवलीय कायदा आणि सुवस्था असं म्हणण्या खेरीज सर्वसामान्यांकडे पर्यायच उरत नाही.

संबंधित विषय
Advertisement