डिजिटल पेमेंट पद्धती वापरा, RBI चं आवाहन


डिजिटल पेमेंट पद्धती  वापरा, RBI चं आवाहन
SHARES

मुंबईत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक ऑफिसांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेमेंट करताना जास्तीत जास्त डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा असं आवाहन भारतातील देशातील नागरिकांना केलं आहे 

भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे.  आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील पहिला मृत्यू कस्तुरबा रुग्णालयामध्ये झाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारतातील नागरिकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी एखादं पेमेंट करताना जास्तीत जास्त डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा. कोरोना व्हायरस पसरणं थांबवण्यासाठी डिजिटल पेमेंट पद्धती वापरणं आवश्यक असल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता विळखा लक्षात घेता आरबीआयने हे पाऊल उचललं आहे.

आरबीआयने म्हटलं की,  NEFT, IMPS, UPI आणि BBPS फंड ट्रान्सफर यांसारख्या पर्यायांचा वापर करून आवश्यक वस्तूंची खरेदी-विक्री करणं शक्य आहे. या सुविधा 24 तास उपलब्ध आहेत. तुमच्या सोयीसाठी मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशा पेमेंट पद्धतींचा वापर करा. त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीचे पेमेंट करण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असं आवाहन देखील आरबीआयकडून करण्यात आले आहे.


संबंधित विषय