बँकांच्या ATM कार्ड वापरण्याच्या नियमात बदल

एटीएम सेवा पुरवठादारांसाठी ATM सर्व्हिस प्रोव्हायडरची नवी नियमावली ३१ डिसेंबरला जारी होणार आहे.

SHARE

विविध बँकांच्या ATM कार्ड वापरण्याच्या नियमात बदल होणार आहे. रिझर्व बँकेनं गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी ATM सर्व्हिस प्रोव्हायडरची नवी नियमावली ३१ डिसेंबरला जारी होणार आहे. त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं RBI नं स्पष्ट केलं आहे

यामागील उद्देश काय?

सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशानं हे बदल करण्यात येणार आहेत. व्यापारी बँका आणि नागरी सहकारी बँकांमध्ये ATM स्विच अॅप्लिकेशन सेवा पुरवठादराप्रमाणे बदलतं. त्यासाठी कुठले नियम नाहीत. हे नियम ३१ डिसेंबरला जारी होतील. ते झाल्यानंतर एटीएम वापरण्यासंबंधीचे नियम ग्राहकांसाठीही बदलू शकतात.

'या' बँकेच्या नियमात बदल

दरम्यान १५ डिसेंबरपासून काही बँकांनी एटीएम सेवेसाठी जादा पैसे आकारायचं ठरवलं आहे. १५ डिसेंबरपासून आयसीआयसीआय बँक बचत खात्याच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. तुम्हाला जर हे बदलेले नियम माहीत नसतील तर तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे

बचत खात्यात पैसे भरणं आणि पैसे काढण्यासाठी आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. एटीएममधून केल्या जाणाऱ्या ट्रान्झाक्शनवरही किरकोळ दंड आकारण्यात येत होता. मात्र आता बँकेचे नियम बदलण्यात आले असून चार्ज लावण्यात येणार आहेहेही वाचा

रेपो दरात बदल नाही, रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक पतधोरण जाहीर

पीएमसीचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण?


संबंधित विषय
ताज्या बातम्या