रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरूवारी रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता रेपो दर ५.१५ टक्क्यांवर कायम राहिला आहे. रेपो दरात कपात न झाल्याने बँकांचे व्याजदर कमी होण्याची आशा बाळगणाऱ्यांची निराशा झाली आहे.
आरबीआयच्या पतधोरण आढावा समितीची बैठक मंगळवारपासून सुरू आहे. तीन दिवसांच्या या बैठकीअखेर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कपात न करण्याचा निर्णय घेतला. रिव्हर्स रेपो दरातही आरबीआयने बदल केला नाही. रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्क्यांवर कायम राहिला आहे. याआधी आरबीआयने सलग पाच वेळा रेपो दरात कपात केली होती. या कपातीला डिसेंबरमध्ये ब्रेक लागला आहे
आर्थिक वर्षांतील पाचवे द्विमासिक पतधोरण रिझव्र्ह बँक गुरुवारी जाहीर केले. आरबीआयने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जीडीपीचा अंदाज घटवून ५ टक्के केला आहे. याआधी जीडीपी ६.१ टक्के राहील, असा अंदाज आरबीआयने वर्तवला होता. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जीडीपी ५.९ ते ६.३ टक्के राहील असा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे.
हेही वाचा -
PNB घोटाळा : नीरव मोदीला बँकेनेच दिली २५ हजार कोटींची बेकायदा हमीपत्रे
आता 'इतक्या' दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट, 'ट्राय'चा नवा नियम