Advertisement

सलग चौथ्यांदा रेपो दरात आरबीआयकडून कपात?

रेपो दर सध्या ५.७५ टक्के आहे. बुधवारच्या पतधोरणात रेपो दर ०.२५ टक्क्याने घटून ५.५० टक्के होण्याची शक्यता आहे. जूनमधील आढावा पतधोरणात आरबीआयने आगामी काळातही व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले होते.

सलग चौथ्यांदा रेपो दरात आरबीआयकडून कपात?
SHARES

रिझर्व्ह बँक बुधवारी चालू आर्थिक वर्षातील तिसरे द्वैमासिक आढावा पतधोरण जाहीर करणार आहे. यावेळी सलग चौथ्यांदा आरबीआयकडून रेपो दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थव्यवस्थेतील सुस्ती, औद्योगिक उत्पादनातील घट आणि आवाक्यातील महागाई दर लक्षात घेता आरबीआय रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करू शकते. आरबीआयने याआधील सलग तीन वेळा रेपो दरात कपात करून व्याजदर स्वस्त केले आहेत. 


उद्योगांची वाढ मंदावली

रेपो दर सध्या ५.७५ टक्के आहे. बुधवारच्या पतधोरणात रेपो दर ०.२५ टक्क्याने घटून ५.५० टक्के होण्याची शक्यता आहे. जूनमधील आढावा पतधोरणात आरबीआयने आगामी काळातही व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले होते. महागाई दरही आरबीआयने ठेवलेल्या लक्ष्याच्या जवळपास आहे. दुसरीकडे वाहन विक्रीत सातत्याने होत असलेली घसरण, ८ प्रमुख उद्योगांच्या वाढीचा घटलेला दर, कृषी आणि निर्मिती क्षेत्राची खराब कामगिरी यामुळे आरबीआय व्याजदर घटवण्याचा निर्णय घेऊ शकते.  


बँकांकडून अल्प कपात

आरबीआयने मागील सलग तीन आढावा पतधोरणात रेपो दर घटवून कर्ज स्वस्त केले आहे. मात्र, बँकांनी या व्याजदर स्वस्ताईचा फायदा आपल्या ग्राहकांना दिला नसल्याचं दिसून येत आहे. बँकांनी तेवढ्या प्रमाणात आपले व्याजदर घटवले नाहीत. ज्या दराने आरबीआय देशातील बँकांना कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. रेपो दर घटवल्याने आरबीआयकडून बँकांना मिळणारं कर्ज स्वस्त होतं. त्यामुळे बँकांनी आपले गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाचा व्याजदर कमी करतात. हेही वाचा  -

शेअर बाजाराविषयी अनाठायी भीती

शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा