आता 200 रुपयांंची नोट येणार! छपाई जोरात सुरु...

  Mumbai
  आता 200 रुपयांंची नोट येणार! छपाई जोरात सुरु...
  मुंबई  -  

  पाचशे आणि 1 हजार रुपयांची नोट बंद झाल्यापासून बाजारात सुट्ट्या पैशांचा निर्माण झालेला तुटवडा अजूनही संपलेली नाही. रिझर्व्ह बँकेने 100 आणि 500 रुपयांच्या नोटांची पुरेशी छपाई केल्याचा दावा केला असला, तरी बाजारात या नोटांची कमतरताच दिसून येत आहे.


  सुट्या पैशांची कमतरता

  परिणामी बऱ्याच दुकानांबाहेर अजूनही 2000 आणि 500 रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाही, अशी पाटी दिसून येते. त्यामुळे रिझर्व्ह बँक सुट्या पैशांची ही अडचण सोडविण्यासाठी लवकरच 200 रुपयांची नवी नोट घेऊन येत आहे.


  सोशल मीडियावर व्हायरल

  ही नोट नेमकी कधी येईल, याची अधिकृत तारीख अद्याप रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेली नसली, तरी जुलै महिन्यातच ही नोट बाजारात येईल, असे म्हटले जात आहे. या नोटेचा रंग कसा असेल? ही नोट कशी दिसेल? याविषयी सोशल मीडियातही बरेचसे मेसेज व्हायरल व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे.


  छपाई जोरात सुरू

  रिझर्व्ह बँकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 200 रुपयांच्या नोटांची छपाई जोरात सुरु आहे. 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांपाठोपाठ 200 रुपयांच्या नोटा बाजारात आणण्याची योजना केंद्र सरकारने आखली हाेती. ही नोट कशी असेल याविषयी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी छपाई मात्र सुरु झाल्याचं सूत्रांकडून समजतंय.


  प्रस्ताव यापूर्वीच मंजूर

  त्यानुसार रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाने 200 रुपयांच्या नोटांच्या छपाईचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर केला आहे. 200 रुपयांच्या नोटा बाजारात आल्यानंतर सुट्या पैशांची अडचण दूर होईल, असे आरबीआयला वाटत आहे.

  विशेषकरुन जुन्या 500 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर सर्वसामान्यांना खूपच अडचण सहन करावी लागली. 8 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाअगोदर 500 रुपयांच्या 1 हजार 650 कोटी नोटा बाजारात होत्या.  हे देखील वाचा - 

  नोटाबंदीनंतर मुंबईत मोबाईल कंपन्या झाल्या लखपती!  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.