देशातील बँकांनी काही व्यक्तींना किंवा कंपन्यांना देण्यात आलेल्या 68 हजार 607 कोटी रुपयांच्या कर्जावर बँकांनी पाणी सोडलं आहे, अशी कबूली आता खुद्द रिझर्व्ह बँकेनेच दिली आहे. या कर्जामध्ये पीएनबी बँकेला फसवून परदेशात पळालेल्या मेहुल चोक्सीचा देखील समावेश आहे.
माहिती अधिकाराअंतर्गत आरबीआयला विचारण्यात आलेल्या प्रश्नांतून हा धक्कादायक खुुलासा आरबीआयने केला आहे. आरबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 50 मोठ्या कर्जबुडव्यांचे (Wilful defaulters) एकूण 68 हजार 607 कोटींचं कर्ज बुडीत खात्यात (राइट ऑफ खात्य) टाकण्यात आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी आरबीआयकडे बँकांनी दिलेल्या कर्जाबाबत माहिती मागवली होती.
After @nsitharaman refused to answer Wayanad MP @RahulGandhi's question on top 50 willful defaulters in the Lok Sabha, I'd filed an RTI asking the same question.
— Saket Gokhale (@SaketGokhale) April 27, 2020
The RBI responded to my RTI with a list of willful defaulters (and the amount owed) as of 30th Sep, 2019.
(1/2) pic.twitter.com/gJMCFv8fAX
साकेत गोखले यांनी सांगितलं की, केंद्राकडून त्यांना याबाबत उत्तर मिळाले नसून आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी अभय कुमार यांनी त्यांच्या अर्जाला उत्तर दिले. आरबीआयने दिलेल्या या माहितीनुसार, या रकमेमध्ये 68 हजार 607 कोटींची एकूण थकबाकी आणि तांत्रिकदृष्ट्या बुडवलेली रक्कम आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत अशी राइट ऑफ करण्यात आलेली कर्ज माफ करण्यात आली आहेत.
सर्वात जास्त कर्ज माफ झालेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये मेहुल चोक्सीची गितांजली जेम्स लिमिटेड पहिल्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे या कंपनीची सहकारी कंपनी जिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रँड्स लिमिटेड या कंपन्यांचा देखील समावेश आहे. या कंपन्यांचे मिळून 8 हजार 100 कोटींचे कर्ज आहे. या 50 कंपन्यांच्या यादीमध्ये संदीप झुनझुनवाला आणि संजय झुनझुनवाला यांच्या आइआय अॅग्रो या कंपनीचं देखील नाव आहे. या कंपनीवर 4,314 कोटींचं कर्ज आहे. त्याचप्रमाणे या यादीमध्ये जितेन मेहता यांची विन्सम डायमंड्स अॅण्ड ज्वेलरी ही कंपनी देखील आहे, ज्यांच्या नावावर 4 हजार 76 कोटींचं कर्ज आहे.
रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड (2,850 कोटी रुपये), पंजाबमधील कुडोस केमी (2,326 कोटी रुपये), बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या मालकीची असणारी इंदौरमधील रुचि सोया इंडस्ट्रीज (2,212 कोटी रुपये), ग्वालियारमधील झूम डेलव्हलपर्सं प्रायव्हेट लिमिटेड (2,012 कोटी रुपये) या तीन हजार कोटींपेक्षा कमी कर्ज असणाऱ्या कंपन्याचा देखील समावेश आहे. 2000 कोटींपेक्षा कमी कर्ज असणाऱ्या एकूण 18 कंपन्या राइट ऑफ खात्यात टाकण्यात आल्या आहेत.
मुंबई पोलिसांना मोठा दिलासा, ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश