Advertisement

रिलायन्स इंडस्ट्रीज बनली 'किंंग'; बाजार भागभांडवल ७.४३ लाख कोटींवर

मंगळवारी शेअर्सचा भाव वाढल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भागभांडवल १६ हजार कोटी रुपयांनी वाढून ७.४४ लाख कोटी रुपये झाले. त्यामुळे अाता रिलायन्सनं टीसीएएसला मागं टाकत पहिलं स्थान पटकावलं अाहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज बनली 'किंंग'; बाजार भागभांडवल ७.४३ लाख कोटींवर
SHARES

रिलायन्स इंडस्ट्रीज (अारअायएल) अाता देशातील सर्वात जास्त बाजार भागभांडवल असलेली कंपनी बनली अाहे. मंगळवारी शेअर बाजारात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजार भागभांडवल ७.४३ लाख कोटी रुपयांवर गेलं अाहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या टीसीएसला मागे टाकत रिलायन्स नंबर वन कंपनी बनली अाहे. टीसीएसचे बाजार भागभांडवल अाता ७.३९ लाख कोटी रुपये झालं अाहे. बराच काळ टीसीएस बाजार भागभांडवलात पहिल्या क्रमांकावर होती.


रिलायन्सचा शेअर्स २ टक्के वाढला

मंगळवारी शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर्स २ टक्क्यांनी वाढला अाणि शेअर्सचा भाव ११८२ रुपयांवर पोचला. शेअर्सचा भाव वाढल्याने कंपनीचे बाजार भागभांडवल १६ हजार कोटी रुपयांनी वाढून ७.४४ लाख कोटी रुपये झाले.  त्यामुळे रिलायन्सनं टीसीएएसला मागं टाकत पहिलं स्थान पटकावलं. सोमवारी कंपनीचा शेअर्स ११५० रुपयांवर होता. तर  भागभांडवल ७.२८ लाख कोटी रुपये होते.


कशी घटली टीसीएसची संपत्ती

 टीसीएसचे बाजार भागभांडवल सोमवारी ७.४५ लाख कोटी रुपये होते. मंगळवारी कंपनीचा शेअर्स ०.७० टक्के घसरल्याने भागभांडवल ६ हजार कोटी रुपयांनी घटले. त्यामुळे टीसीएसचे एकूण  बाजार भागभांडवल ७.३९ लाख कोटी रुपयांवर अाले. त्यामुळे रिलायन्सने टीसीएसला पिछाडले. मागील अनेक काळापासून टीसीएस बाजारात अव्वल राहिली अाहे. 



हेही वाचा - 

मास्टर-ब्लास्टरचं एमआयजी काॅलनीत सेकंड होम




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा