Advertisement

मास्टर-ब्लास्टरचं एमआयजी काॅलनीत सेकंड होम

सचिन साहित्य सहवासच्या दुसऱ्या टोकाला राहत असला, तरी त्याचं मन अजूनही रमतंय ते साहित्य सहवास आणि एमआयजी काॅलनीतच. हेच सिद्ध झालंय ते सचिनच्या नव्या गृहखरेदीतून.

मास्टर-ब्लास्टरचं एमआयजी काॅलनीत सेकंड होम
SHARES

वांद्रे पूर्वेकडील साहित्य सहवासमध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर वाढला-खेळला, 'मोठा' झाला. त्यामुळं साहित्य सहवास आणि एमआयजी काॅलनीशी त्याचं एक वेगळंच नातं आहे. सध्या सचिन साहित्य सहवासच्या दुसऱ्या टोकाला राहत असला, तरी त्याचं मन अजूनही रमतंय ते साहित्य सहवास आणि एमआयजी काॅलनीतच. हेच सिद्ध झालंय ते सचिनच्या नव्या गृहखरेदीतून.


कुठं घेतलं घर?

सचिननं नुकतंच वांद्रे पूर्वेकडील एमआयजी काॅलनीतील रूस्तमजी सीजन्स या इमारतीत नवं घर खरेदी केलं आहे. सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर हिच्या नावानं हे खरेदी करण्यात आलं असून नुकतीच या घराची नोंदणी करण्यात आली आहे. वाद्रे पश्चिम इथं सचिनचा मोठा बंगला असून हा बंगला सोडून सचिन पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन येणार का हाच आता प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे साहित्य सहवास-एमआयजी काॅलनीशी असलेलं सचिनचं नातं.


किती किंमत?

एमआयजी काॅलनीचा पुनर्विकास सुरू असून त्याजागी आता टोलेजंग, लक्झ्युरीयस सुविधा असलेल्या इमारती उभ्या रहात आहेत. या इमारतीतील घरांची विक्री कोट्यवधीत होत आहे. तिथंच रूस्तमजी सीजन्सच्या 'बी' विंगमधील १६ व्या मजल्यावरील रूम नंबर १७०४ क्रमांकाचं घर सचिनने खरेदी केलं आहे. हे घर १४५९.३८ चौ. फुटाचं असून त्यासाठी सचिनने ७ कोटी १५ लाख ९० हजार रुपये मोजले आहेत. एप्रिलमध्ये या घराचा खरेदी व्यवहार झाला असून या घराची नोंदणी नुकतीच झाली आहे.


सेकंड होम

वांद्रे पश्चिम इथं सचिनचा ६००० चौ. फुटाचा लक्झ्युरीयस बंगला आहे. या बंगल्यात सचिन काही वर्षांपूर्वीच रहायला आला आहे. असं असताना आता सचिननं सेकंड होम खरेदी केलं आहे. त्यामुळं हे घर गुंतवणूक म्हणून की पुन्हा एमआयजी काॅलनीत परतण्यासाठी खरेदी केलंय हा प्रश्नच आहे.



हेही वाचा-

सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, करणार कोचिंग!

पृथ्वी शाॅचे तंत्र सचिन तेंडुलकरसारखे - मार्क वाॅने केली स्तुती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा