Advertisement

रिलायन्स झाली कर्जमुक्त, ५८ दिवसांत गोळा केले १.६९ लाख कोटी

कोरोनामुळे लागू असलेल्या लाॅकडाऊनचा फटका जगभरातील अर्थव्यवस्था आणि कंपन्यांना मोठा बसला आहे. मात्र, भारतातील रिलायन्स यामध्ये अपवाद ठरली आहे.

रिलायन्स झाली कर्जमुक्त, ५८ दिवसांत गोळा केले १.६९ लाख कोटी
SHARES

कोरोनामुळे लागू असलेल्या लाॅकडाऊनचा फटका जगभरातील अर्थव्यवस्था आणि कंपन्यांना मोठा बसला आहे. मात्र, भारतातील रिलायन्स यामध्ये अपवाद ठरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता संपूर्ण कर्जमुक्त झाली आहे. कंपनीने ५८ दिवसात १.६९ लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. या गुंतवणुकीमुळे आपल्या ठरवलेल्या वेळेआधीच रिलायन्स कर्जमुक्त झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी आपल्या कंपनीच्या गुंतवणूकदारांना ही माहिती दिली. 

जिओ प्लॅटफॉर्मची भागिदारी विक्री आणि राइट्स इश्यूच्या माध्यमातून  रिलायन्स इंडस्ट्रीजने  पैसे उभारले आहेत. जिओमध्ये जागतिक गुंतवणूकदारांनी १,१५,६९३.९५  कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर राइट्सच्या माधध्यमातून ५३,१२४.२० कोटी रुपये मिळाले आहेत. ३१ मार्च २०२० पर्यंत रिलायन्सवर १.६१ लाख कोटींचे कर्ज होते. मात्र, काही दिवसांतच झालेल्या या गुंतवणुकीमुळे कंपनी कर्जमुक्त झाली आहे.  

रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ११ वी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. गेल्या ९ आठवड्यांत सलग १० गुंतवणुकदारांनंतर आता सौदी अरेबिया सॉवरेन वेल्थ फंड पीआयएफ २.३२ टक्के भागभांडवलसाठी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ११,३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. २२ एप्रिलनंतर जिओ प्लॅटफॉर्ममधील ही ११ वी गुंतवणूक आहे. 



हेही वाचा -

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

Coronavirus Updates : यंदा पदवी परीक्षा होणार नाहीत?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा