Advertisement

रिलायन्स जिओला चौथ्या तिमाहीत जबरदस्त नफा

आर्थिक वर्ष 2019 20 च्या चौथ्या तिमाहीत रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 37 कोटींवरून 38.75 कोटी झाली.

रिलायन्स जिओला चौथ्या तिमाहीत जबरदस्त नफा
SHARES

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या नफ्यात जानेवारी-मार्च या चौथ्या तिमाहीमध्ये तब्बल 177 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत जिओला 2331 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे.  चौथ्या तिमाहीत जिओची कमाई 14 हजार 835 कोटी इतकी राहिली झाली. तिमाहीत रिलायन्स जिओचे प्रत्येक ग्राहकामागील सरासरी उत्पन्न 128 रुपयांवरून 130.60 रुपये झाले आहे.

आर्थिक वर्ष 2019 20 च्या चौथ्या तिमाहीत रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 37 कोटींवरून 38.75 कोटी झाली. रिलायन्स जिओची मागील तिमाहीत कमाई 13 हजार 998 इतकी होती. रिलायन्स इंड़स्ट्रिज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, आम्हाला आनंद आहे की आम्ही या कठीण  काळातही ग्राहकांना कनेक्टीव्हीटी सहज देऊ शकलो आणि काम सोपं करता आलं. जिओचे प्रत्येक कर्मचारी हे पहिल्यांदा ग्राहकांना प्राधान्य देतात. यामुळे ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो.

 मागील आठवड्यात जिओ आणि फेसबुक यांच्यात करार झाला. यानुसार फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये 43,574 कोटींची गुंतवणूक कऱण्याची घोषणा केली होती. फेसबुकने रिलायन्स जिओचे 9.9 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. 



हेही वाचा -

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 498 वर

‘याच’ अटींवर सोडता येईल महाराष्ट्र, परप्रांतीयांसाठी दिशानिर्देश जारी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा