Advertisement

म्युच्युअल फंडांना आरबीआयने दिले 50 हजार कोटी, संकटात आली धावून

रोकड टंचाईचा सामना करणाऱ्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या मदतीला आता रिझर्व्ह बँक धावली आहे.

म्युच्युअल फंडांना आरबीआयने दिले 50 हजार कोटी, संकटात आली धावून
SHARES

कोरोनाचा मोठा फटका आता देशातील म्युच्युअल फंड उद्योगाला बसला आहे. शेअर बाजाराही प्रचंड कोसळत आहे. त्यामुळे घाबरलेल्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमधून आपला पैसा काढून घेण्यास सुरूवात केली आहे. यामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांना आता मोठी आर्थिक चणचण भासू लागली आहे.  म्युच्युअल फंड कंपन्या संकटात सापडल्या आहेत.  फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडाने मागील आठवड्यात ३० हजार कोटी रुपयांच्या डेट म्युच्युअल फंडाचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. या कंपनीने आपल्या सहा योजना बंद केल्या आहेत. 

रोकड टंचाईचा सामना करणाऱ्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या मदतीला आता रिझर्व्ह बँक धावली आहे. रिझर्व्ह बँकेने म्युच्युअल फंड उद्योगाला ५० हजार कोटींची रोकड तरलता उपलब्ध केली आहे. आरबीआयने म्युच्युअल फंड बाजारपेठेत तातडीने ५० हजार कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. याशिवाय रेपो दराने म्युच्युअल फंड कंपन्यांना पत पुरवठा करणारी विशेष खिडकी ९० दिवस सुरु ठेवण्यात येणार आहे. म्युच्युअल फंड कंपन्या काॅर्पोरेट बाँड, कमर्शिअल पेपर, डिबेंचर्स आणि सर्टिफिकेट आॅफ डिपाॅझिट गहाण ठेवून आपली आर्थिक मागणी पूर्ण करू शकतात, असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे.

फ्रँकलिन टेम्पल्टन कंपनीने आपल्या योजना बंद केल्याने म्युच्युअल फंड उद्योगात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. मात्र रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजनेने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असं मत आयसीआयसीआय प्रुडेंशिअल म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शहा यांनी व्यक्त केलं. तर

आजचा निर्णय संपूर्ण म्युच्युअल फंड उद्योगाला सकारात्मक संदेश देणारा आहे. या निर्णयामुळे किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यास मदत मिळेल, असे मत इन्व्हेस्टीकाचे प्रमुख अमित सिंग यांनी व्यक्त केले.

फ्रँकलिनच्या या स्कीम बंद

फ्रँकलिन इंडिया टेम्पलटन लो ड्यूरेशन फंड
फ्रँकलिन इंडिया टेम्पलटन शॉर्ट बॉन्ड फंड
फ्रँकलिन इंडिया टेम्पलटन शॉर्ट टर्म इन्कम प्लान
फ्रँकलिन इंडिया टेम्पलटन क्रेडिट रिस्क फंड
फ्रँकलिन इंडिया टेम्पलटन डायनॅमिक अॅक्युरियल फंड
फ्रँकलिन इंडिया टेम्पलटन इन्कम ऑपोर्च्युनिटी फंड



हेही वाचा -

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा खास आराखडा

Coronavirus Update: धारावीत ३४ नवे कोरोनाग्रस्त, एकूण संख्या २७५ वर

Coronavirus Updates: मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, सरकारी नोकरी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा