• पेट्रोलपंप मालक, तेल कंपन्यांमध्ये तोडगा निघणार?
  • पेट्रोलपंप मालक, तेल कंपन्यांमध्ये तोडगा निघणार?
SHARE

मुंबई - सर्व पंपचालकांनी गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय घेतल्यानंतर तेल कंपन्यांना जाग आलीये. तेल कंपन्यांनी पेट्रोल मालक संघटनांना आता चर्चेसाठी बोलावलंय. त्यानुसार शुक्रवारी मुंबईतल्या मरिन प्लाझा या हॉटेलमध्ये चर्चा होणार आहे. मात्र चर्चा निष्फळ ठरली, तर वाहनचालकांना मोठ्याच समस्येला तोंड द्यावं लागेल. "यापूर्वी दोन वेळा चर्चा झालीये. मात्र कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नव्हता. या बैठकीतही तोडगा निघेल असं वाटत नाही," अशी माहिती पेट्रोल डीलर्स असोशियनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी दिली. जर चर्चेमध्ये तोडगा निघाला नाही तर ग्राहकांना काही दिवसांतच पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या