Advertisement

सलिल पारेख इन्फोसिसचे नवे सीईओ


सलिल पारेख इन्फोसिसचे नवे सीईओ
SHARES

देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसने शनिवारी कंपनीचे चीफ एक्झिक्युटीव्ह आॅफिसर आणि मॅनेजिंग डायरेक्टर (सीईओ अँड एमडी) म्हणून सलिल पारेख यांच्या नावाची घोषणा केली. पारेख यांची नियुक्ती ५ वर्षांसाठी केल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं. पारेख आपल्या पदाचा कार्यभार २ जानेवारी २०१८ पासून स्वीकारतील. या निवडीनंतर पारेख या पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार असल्याचं वक्तव्य इन्फोसिस बोर्डाचे चेअरमन नंदन नीलकेणी यांनी केलं.


कुणाच्या जागी नियुक्ती ?

पारेख यूबी प्रवीण राव यांची जागा घेतील. राव आतापर्यंत इंटरिम सीईओ म्हणून आतापर्यंत कंपनीचा कारभार बघत आहेत. २ जानेवारीनंतर राव पूर्वीप्रमाणेच चीफ आॅपरेटींग आॅफिसर आणि कंपनीचे पूर्णवेळ डायरेक्टर म्हणून काम पाहतील.


यापूर्वी कुठे होते पारेख ?

याअगोदर पारेख कॅपजेमिनी ग्रुपच्या एक्झिक्युटीव्ह बोर्डाचे सदस्य होते. या ग्रुपसोबत ते २००० पासून कार्यरत होते. आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी २ डिसेंबरलाच दिला असून तो १ जानेवारीपासून लागू होईल.

पारेख यांनी काॅरनेल युनिव्हर्सिटीतून कम्प्युटर सायन्स आणि मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे. सोबतच आयआयटी बाॅम्बेमधून एअरोनाॅटीकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेकही केलं आहे.


काय म्हणाले नीलकेणी ?

आयटी सर्व्हिस इंडस्ट्रीचा पारेख यांना ३० वर्षांचा अनुभव आहे. कंपनीच्या गुतवत्तापूर्वक सुधारांमध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांनी यशस्वीपणे अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इन्फोसिस योग्य दिशेने वाटचाल करेल, असं मत नीलकेणी यांनी व्यक्त केलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा