कोकणातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर


SHARE

मुंबई - कोकण कृषी विद्यापिठ व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “परदेशी भाजीपाला, नर्सरी उद्योग व नाबार्डच्या कृषी योजना” या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आलंय. रविवारी 27 नोव्हेंबरला सकाळी 10 ते सायं. 7 या वेळेत दादर पश्चिममधील महाराष्ट्र हायस्कूल क्र. 2, दत्तराऊळ मैदानात या शिबिराचे आयोजन करण्यात आलय. कोकणातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीबरोबरच वर्षभर करता येणाऱ्या नगदी उत्पन्न देणाऱ्या उद्योंगांकडे वळावे या दृष्टीकोणातून या शिबिराचे आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात कृषी विद्यापिठाचे प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी व नाबार्डचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त लोकांनी या शिबारीत सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र तावडे यांनी केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या