Advertisement

सेवा क्षेत्राची कामगिरी ३ महिन्यांच्या निच्चांकी

नोव्हेंबर २०१७ मध्ये सेवा (सर्व्हिस सेक्टर) क्षेत्राची कामगिरी ३ महिन्यांच्या निच्चांकी स्थानी घसरली आहे.

सेवा क्षेत्राची कामगिरी ३ महिन्यांच्या निच्चांकी
SHARES

कमकुवत मागणी तसेच वस्तू आणि सेवा करा (जीएसटी) मुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती, यामुळे नोव्हेंबर २०१७ मध्ये सेवा (सर्व्हिस सेक्टर) क्षेत्राची कामगिरी ३ महिन्यांच्या निच्चांकी स्थानी घसरली आहे. सेवा क्षेत्राची कामगिरी मोजणाऱ्या निक्केई इंडिया सर्व्हिसेस पर्चेसिंग मॅनेजिंग इंडेक्स (पीएमआय) नोव्हेंबरमध्ये ४८.५ वर आला. हाच इंडेक्स आॅक्टोबरमध्ये ५१.७ वर होता.


'पीएमआय' म्हणजे काय?

सेवा क्षेत्रातील ‘पीएमआय’मध्ये मागील ३ महिन्यांतील ही मोठी घसरण आहे. ‘पीएमआय’नुसार ५० हून कमी अंक सेवा क्षेत्राची घसरण आणि ५० हून अधिक अंक या क्षेत्रातील वाढ दर्शवतात.


काय सांगतो अहवाल?

हा अहवाल देणारी लेखिका आणि आयएचएस मार्केट अर्थशास्त्रज्ञ आशना डोढिया म्हणाल्या की, मागील दोन महिन्यांपासून अल्पवृद्धीमुळे रिकव्हरची शक्यता होती. पण नोव्हेंबरमध्ये या सर्व अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं आहे. सेवा क्षेत्रातील घसरणीमुळे उत्पादन क्षेत्रातील वाढीवरही परिणाम होत आहे.

या अहवालानुसार, नोव्हेंबर महिन्यांत सेवा क्षेत्रात अत्यंत कमी प्रमाणात नवीन उद्योग सुरू झाले आहेत. प्रामुख्याने जीएसटीमुळे एखाद्या उत्पादनाचं मूल्य किती असेल? याबाबत गोंधळ असल्याने जोखीम न पत्करण्याच्या भूमिकेमुळे नवीन उद्योगांत कुणीही हात घालण्याचं धाडस केलेलं नाही.


उत्पादन क्षेत्रात तेजी

सेवा क्षेत्राच्या अगदी उलट उत्पादन क्षेत्रात मात्र नोव्हेंबरमध्ये तेजी पाहायला मिळाली. मागील १३ महिन्यांतील ही सर्वाधिक तेजी आहे. नोव्हेंबरमध्ये निक्केई इंडिया मॅन्युफॅक्चरींग पीएमआय ५२.६ नोंदवण्यात आला. आॅक्टोबरमध्ये हाच आकडा ५०.३ एवढा होता.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा