सिद्धिविनायक दानपेटीत २८ टक्के वाढ

 Ravindra Natya Mandir
सिद्धिविनायक दानपेटीत २८ टक्के वाढ

प्रभादेवी- दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील पैशांची मोजणी करण्यात आली आहे. ५००-१००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर पूजा आणि अभिषेकासाठी ५०० -१००० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आलेली. परंतु दान पेटीत कुणी किती रुपये टाकावेत, यावर मंदिर न्यासाचे नियंत्रण नसल्यामुळे ५००-१००० रुपयांच्या नोटा अनेक भाविकांनी टाकल्याने दानपेटीत तब्बल २८ टक्यांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये ५००-१००० रुपयांच्या नोटांचा समावेश असल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे सीईओ संजीव पाटील यांनी दिली. त्याच बरोबर मंदिरात फक्त नोटा बंद करण्यात आल्या होत्या, परंतु पूजा अभिषेकचे बुकिंग करण्यासाठी परदेशी आणि भारतात असलेल्या भक्तांसाठी ऑनलाईन सुविधा तसे कार्डने पैसे भरण्याची व्यवस्था मंदिर न्यासाकडून करण्यात आली आहे असेही ते म्हणाले .

Loading Comments