'ह्या' ६ म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल

वर्ष २०१९ हे आर्थिक आघाडीवर गुंतवणूकदारांना दिलासा देणारं ठरलं आहे. या वर्षात शेअर बाजाराने नवीन विक्रम करत विक्रमी वाटचाल सुरू ठेवली आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनाही समाधानकारक परतावा मिळाला आहे.

SHARE

वर्ष २०१९ हे  आर्थिक आघाडीवर गुंतवणूकदारांना दिलासा देणारं ठरलं आहे. या वर्षात शेअर बाजाराने नवीन विक्रम करत विक्रमी वाटचाल सुरू ठेवली आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनाही समाधानकारक परतावा मिळाला आहे. ६ म्युच्युअल फंडांनी तब्बल २२.२० टक्के परतावा दिला आहे.  या वर्षी उत्कृष्ट परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केलेल्या या म्युच्युअल फंडांंची माहिती घेऊया. 

अ‍ॅक्सिस ब्ल्यूचिप म्युच्युअल फंड

अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या ब्लूचिप फंडाने (डायरेक्ट प्लॅन) एका वर्षामध्ये गुंतवणूकदारांना २२.२० टक्के परतावा दिला आहे. अ‍ॅक्सिस ब्लूचिप म्युच्युअल फंडाची सुरुवात १ जानेवारी २०१३ रोजी झाली. तेव्हापासून आतापर्यंत या फंडाने गुंतवणूकदारांना १६.०९ टक्के परतावा दिला आहे. या फंडामध्ये तुम्ही कमीत कमी 5000 रुपये गुंतवू शकता. तुम्हाला एसआयपीमार्फत गुंतवणूक करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही किमान ५०० रुपयेही गुंतवू शकता.

एसबीआय फोकस इक्विटी फंड (डायरेक्ट प्लॅन)

जानेवारी २०१३ मध्ये सुरू झालेल्या या म्युच्युअल फंडाने  २०१९ मध्ये २१.३४ टक्के परतावा दिला आहे. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही १०० रुपयांची गुंतवणूक केली असती तर आतापर्यंत ते १२१.३४ रुपये झाले असते. सुरू झाल्यापासून आतापर्यंत या फंडाने  १५.०१ टक्के परतावा दिला आहे. या मल्टीकॅप फंडाद्वारे आपण किमान ५००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर एसआयपीद्वारे गुंतवणूकीची किमान रक्कम ५०० रुपये आहे.

अ‍ॅक्सिस फोकस २५ प्लॅन (डायरेक्ट प्लॅन)

या म्युच्युअल फंडाने २०१९ मध्ये गुंतवणूकदारांना १९.८५ टक्के परतावा दिला आहे. जानेवारी २०१३ मध्ये सुरू झालेल्या या फंडाने आतापर्यंत १६.३० टक्के परतावा दिला आहे. या फंडात तुम्ही कमीत कमी ५००० रुपये आणि एसआयपीच्या माध्यमातून किमान १००० रुपये गुंतवू शकता.

मोतीलाल ओसवाल फोकस २५ फंड (डायरेक्ट प्लॅन)

  या लार्ज कॅप फंडाने २०१९ मध्ये गुंतवणूकदारांना १८.४९ टक्के परतावा मिळाला आहे. १३ मे २०१३ रोजी सुरू झालेल्या या फंडाने आतापर्यंत १५.६८ टक्के परतावा दिला आहे. या फंडात किमान ५०० रुपयांच्या गुंतवणूकीने सुरूवात करता येते. 

कॅनरा रोबेको ब्ल्यूचिप इक्विटी फंड (डायरेक्ट प्लॅन) 

कॅनरा रोबेकोच्या या फंडाने यावर्षी (२७  नोव्हेंबरपर्यंत) आतापर्यंत १८.१० टक्के परतावा दिला आहे. हा फंड २ जानेवारी २०१३  रोजी सुरू झाला. आतापर्यंत या फंडाने १३.३५ टक्के परतावा दिला आहे. या लार्ज कॅप फंडात कमीत कमी ५००० रुपये आणि एसआयपीच्या माध्यमातून किमान १००० रुपये गुंतवू शकता.

मिराए अॅसेट  इमर्जिंग ब्लूचिप फंड

 या फंडाने २०१९ मध्ये १७.७२ टक्के परतावा दिला आहे. लार्ज आणि मिड कॅप प्रकारातील या फंडाने १ जानेवारी २०१३ पासून २३.५४ टक्के परतावा दिला आहे. या फंडामध्ये तुम्ही कमीतकमी ५००० रुपये गुंतवू शकता. त्याचबरोबर एसआयपीद्वारे गुंतवणूकीची किमान रक्कम एक हजार रुपये आहे.हेही वाचा  -

रिलायन्स इंडस्ट्रीजने रचला 'हा' नवा इतिहास

विद्यार्थी क्रेडिट कार्डचे 'हे' आहेत फायदे
संबंधित विषय
ताज्या बातम्या