Advertisement

स्वयंपाकाचा गॅस ८ रुपयांनी महाग


स्वयंपाकाचा गॅस ८ रुपयांनी महाग
SHARES

तेल कंपन्यांनी स्वयंपाकाचा गॅस अर्थात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. अनुदानित एलपीजी ८ रुपयांनी तर विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर ७४ रुपयांनी महागला आहे. नवी दरवाढ शुक्रवारपासून लागू करण्यात आली आहे. सातत्याने होणाऱ्या या दरवाढीमुळे गृहिणींच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे. ऑईल मार्केटींग कंपनी इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत ४८२.०८ रुपयांना मिळणारा एलपीजी सिलिंडर आता ४८९.९७ रुपयांना मिळेल.


मागील ६ वर्षांतील सर्वाधिक वाढ

केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरील अनुदान बंद करण्यासाठी दरमहा २ रुपयांनी वाढ करण्याचे घोषित केले होते. त्यानंतर २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ४ रुपयांनी वाढ करण्याच्या सूचना दिल्या. तरीही तेल कंपन्यांनी १ जुलै रोजी अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमती ३२ रुपयांनी वाढवल्या. ही मागील ६ वर्षांतील सर्वाधिक वाढ होती. सरकारने जीएसटी लागू केल्याने ही वाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. पण याची मोठी झळ सर्वसामान्यांना बसली.


५ महिन्यांत १३.४७ रुपयांनी महागला सिलिंडर

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात २०१७-१८ मध्ये आतापर्यंत अनुदानित एलपीजी सिलिंडर मुंबईत १३.४७ रुपयांनी महागला आहे. एप्रिल महिन्यात अनुदानित सिलिंडरची किंमत ४७६.५० एवढी होती.

याउलट, विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर मागील ५ महिन्यांमध्ये १५३.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. एप्रिल महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरची किंमत मुंबईत ७२९.५० रुपये एवढी होती.


४ मेट्रो सिटीतील अनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर :


शहर
नवे दर (रू)
जुने दर (रू)
मुंबई
४८९.९७
४८२.०८
दिल्ली
४८७.१८
४७९.७७
कोलकाता
४८९.९९
४८२.५८
चेन्नई
४७५.२६
४६७. ३५

 
 
४ मेट्रो सिटीतील विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर :


शहर
नवे दर (रू)
जुने दर (रू)
मुंबई
५७६.००
५०२.५०
दिल्ली
५९७.५०
५२४.००
कोलकाता
६१६.५०
५४३.००
चेन्नई
६०७.००
५३३.००

 
 
 


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 
  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा