Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

मुंबई देशातलं सर्वात महागडं शहर!

महागड्या शहरांच्या जागतिक क्रमवारीत मुंबई ५५ व्या क्रमांकावर आहे. 'इंटरनॅशनल कन्सल्टिंग फर्म मर्सर'च्या 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग' २०१८ या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

मुंबई देशातलं सर्वात महागडं शहर!
SHARES

देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणारी मुंबई देशातील सर्वात महागडी ठरली आहे. तर महागड्या शहरांच्या जागतिक क्रमवारीत मुंबई ५५ व्या क्रमांकावर आहे. 'इंटरनॅशनल कन्सल्टिंग फर्म मर्सर'च्या 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग' २०१८ या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. मुंबईसह देशातील इतर ६ शहरांचाही या यादीत समावेश करण्‍यात आला आहे.


महागाईचा दर सर्वात जास्त

जगभरातील २०९ शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक शहरातील २०० वस्तूंच्या दरांची तुलना करून त्याआधारे क्रमवारी ठरवण्यात आली. सर्व्हेत समावेश करण्यात आलेल्या भारतीय शहरांमध्ये महागाईचा दर ५.५७ टक्के नोंदवण्यात आला. हा दर देशात सर्वात जास्त होता. या सर्व्हेनुसार लोणी, मटण, चिकन आणि शेतीच्या उत्पादनांसह मद्याचे दर जास्त असल्याने शहरातील 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग'मध्ये वाढ झाल्याचं निरिक्षण या सर्व्हेत नमूद करण्यात आलं.


जगात हाँगकाँग महागडं

देशात महागड्या शहरात मुंबईसह दिल्ली (१०३), चेन्नई (१४४) , बंगऴुरू (१७०) आणि कोलकाता (१८२) या शहरांचा समावेश आहे. तर या यादीत ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न ५८ व्या क्रमांकावर आणि युरोपमधील फ्रँकफर्ट या यादीत ६८ व्या क्रमांकावर आहे. जागतिक क्रमवारीत हाँगकाँग हे सर्वात महागडं शहर ठरलं आहे.


हेही वाचा - 

हार्डवर्कर मुंबईकर!

स्वच्छ सर्वेक्षण 2018 : मुंबई सर्वात स्वच्छ राजधानी!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा