Advertisement

येतंय टाटा नॅनोचं इलेक्ट्रीक व्हर्जन


येतंय टाटा नॅनोचं इलेक्ट्रीक व्हर्जन
SHARES

ग्राहकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरलेली टाटाची नॅनो कार आता नव्या ढंगात बाजारात येऊ घातली आहे. ‘जेयम आटोमोटीव्ह’ ही कंपनी टाटा नॅनोचं इलेक्ट्रीक व्हर्जन ‘निओ’ या ब्रॅण्डनेम अंतर्गत लाॅन्च करण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर्सकडून या कारची बाॅडी शेल आणि कम्पोनट्स पुरवण्यात येतील. तर जेयम आॅटो ‘निओ’ कार असेंबल करून तिचं मार्केटींग देखील करेल.


पंतप्रधानांच्या हस्ते लाॅन्च?

या कारचं लाॅन्चिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. सुरूवातीच्या टप्प्यांत ही कार सिटी टॅक्सी म्हणून वापरण्यात येणार असून वैयक्तिक वापरासाठी असणार नाही.

या इलेक्ट्रीक ‘निओ’ कारचं पहिलं माॅडेल लवकरच बाजारात आणलं जाईल. सद्यस्थितीत भारतातील अनेक कंपन्या इलेक्ट्रीक कारचं उत्पादन करण्यात रूची दाखवत असून ‘निओ’ येणाऱ्या काळात इलेक्ट्रीक कारमध्ये ट्रेण्डसेटर ठरेल, असं मत जेयम आटोमोटीव्ह कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जे. आनंद यांनी व्यक्त केलं.

तर, इलेक्ट्रीक व्हेइकल मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बाजावण्याची टाटा मोटर्सची इच्छा असून पॅसेंजर कार सोबतच इलेक्ट्रीक कमर्शिअल व्हेइकल विकसित करण्याचा टाटा मोटर्सचा यापुढं प्रयत्न असेल. ‘निओ’च्या उत्पादनासाठी कंपनीकडून ‘जेयम आॅटोमोटीव्ह’ला कारची बाॅडी शेल आणि कम्पोनट्स पुरवण्यात येतील, असं टाटा मोटर्सकडून स्पष्ट करण्यात आलं.‘निओ’ चे फिचर्स

  • नवी ‘निओ’ कार ४८ व्होल्टची
  • त्यातून २३ हाॅर्सपाॅवरची ताकद
  • ही कार पूर्णत: एसी
  • स्टॅण्डर्ड नॅनोचं वजन ६३६ किलो
  • तर इलेक्ट्रीक नॅनोचं वजन ८०० किलो
  • एकदा चार्ज केल्यावर २०० किमी धावेल
  • एसी सुरू असताना ४ प्रवाशांसहित १५० किमीपर्यंत धाव
  • आॅटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया (एआरएआय)कडे दावा
  • ही कार इलेक्ट्रीक ड्राइव्ह सिस्टीमवर धावेल
  • ही सिस्टीम इलेक्ट्रा ईव्ही या कंपनीकडून डेव्हलप


तोट्यातून बाहेर येणार?

टाटा नॅनो ही भारतातील सर्वात स्वस्त कार २००८ मध्ये लाॅन्च करण्यात आली होती. मात्र या कारला ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने या कारमुळे टाटा मोटर्सला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. सुरूवातीला १ लाखांत मिळणारी या कारची किंमत २.५० ते ३ लाख रुपयांदरम्यान आहे. २०१० मध्ये टाटा मोटर्सने नॅनोच्या इलेक्ट्रीक व्हर्जनची घोषणा केली होती.


उत्पादन थांबवणार?

सद्यस्थितीत या कारची मागणी कमालिची घटली असून कंपनी कारचं उत्पादन पूर्णपणे बंद करण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. कारण सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) संघटनेच्या आकडेवारीनुसार टाटा मोटर्सने देशभरात केवळ ५७ नॅनो कार्स विकल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने ७२६ नॅनो विकल्या होत्या.

तर कंपनीने उत्पादनातही कमालिची घट केली आहे. आॅक्टोबर महिन्यात कंपनीने ७४ नॅनोचं उत्पादन केलं होतं. तर गेल्या वर्षी याच महिन्यात ७२० नॅनोचं उत्पादन केलं होतं. मागच्या ६ महिन्यांत कंपनीने केवळ १४९३ नॅनो विकल्या आहेत. समान कालावधीत कंपनीने ५१८५ नॅनो कार विकल्या होत्या.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा