Advertisement

मंदिर, ट्रस्टने केलं सरकारच्या निर्णयाचं स्वागत


मंदिर, ट्रस्टने केलं सरकारच्या निर्णयाचं स्वागत
SHARES

मुंबई - केंदीय सचिव भारत सरकार यांच्या मार्फत प्राप्त निर्देशानुसार राज्यसरकारच्या विधी विभागाने राज्यातील देवस्थानांमध्ये काळा पैसा रोखण्यासाठी परिपत्रक काढले आहे.
राज्यातील सर्व देवस्थाने आणि धर्मादायी संस्था यांच्याकडे दान स्वरुपात मिळणारे चलनी नोटा आणि नाणी कोणत्याही परिस्थितीत आपल्या बँक खात्यात जमा झाल्या पाहिजेत असा आदेश या परिपत्रकात जारी करण्यात आला. तर राज्यातील सर्व देवस्थानांना आणि धर्मदाय संस्थांना हा आदेश पाळणं बंधनकारक असल्याचं ही या परिपत्रकात म्हटलंय. साईबाबा संस्थान, सिध्दीविनायक मंदिर, विठ्ठल-रखुमाई,पंढरपूर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थाने समिती, तुळजा भवानी सोलापूर आणि राज्य धर्मादाय आयुक्त यांच्या अखत्यारित असलेल्या सर्व सार्वजनिक, धार्मिक, धर्मदाय संस्थांना हा आदेश बंधनकारक असणार आहे. या परिपत्राकामागे काळा पैसा रोखण्याचा मुख्य उद्देश आहे असे सांगण्यात येत आहे. मुंबई लाईव्हच्या टीमने सिद्धिविनायक समितीचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांंनी परिपत्रक मिळाल्याचा दुजोरा दिला, तसेच सरकारच्या भूमिकेेचे स्वागत केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा