Advertisement

'ह्या' बँकांकडून मिळेल स्वस्त Education Loan

शैक्षणिक कर्जाच्या मदतीने केवळ देशातच नव्हे तर परदेशातही उच्च शिक्षण मिळवणे सोपे झाले आहे. प्रत्येक बँकेत शैक्षणिक कर्जाची सुविधा आहे.

'ह्या' बँकांकडून मिळेल स्वस्त Education Loan
SHARES

प्रत्येकाला चांगलं शिक्षण (Education)  किंवा चांगली नोकरी मिळवायची इच्छा असते. परंतु आजच्या महागाईच्या युगात उच्च शिक्षण महाग झालं आहे. मोठी आणि  चांगली महाविद्यालये किंवा शिक्षण संस्थांची फी प्रत्येकाला परवडत नाही. अशा वेळी शिक्षण कर्ज (Education Loan) उपयोगी पडते. शैक्षणिक कर्जाच्या मदतीने केवळ देशातच नव्हे तर परदेशातही उच्च शिक्षण मिळवणे सोपे झाले आहे. प्रत्येक बँकेत शैक्षणिक कर्जाची सुविधा आहे. कर्जाची तुलना करणारी वेबसाइट myloancare.in नुसार स्टेट बँक ऑफ इंडिया (Sbi - एसबीआय) आणि इंडियन बँक (indian bank) देशातील शिक्षणासाठी  स्वस्त दरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देत आहेत.

मुलांचे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा प्रोफेशनल कोर्ससाठी विद्यार्थी किंवा त्यांचे पालक बँकांकडून शैक्षणिक कर्ज (Education Loan) घेऊ शकतात. शैक्षणिक संस्था सरकार मान्य असली पाहिजे ही यासाठी एक अट आहे. आपले ज्या बँकेत आधीपासून खाते आहे अशा बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेणे आपल्यासाठी सोपे असेल. शैक्षणिक कर्जामध्ये महाविद्यालय, वसतिगृह, ग्रंथालय, अभ्यासासाठी संगणक खरेदी तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या बाबतीत प्रवास खर्च यांचा समावेश आहे.


बँकब्याजदर (%)भारतात शिक्षणासाठी कर्ज रक्कमपरदेशात शिक्षणासाठी कर्ज रक्कम
IIT, IIM, ISB कोर्स कर्ज रक्कमकालावधी
स्टेट बँक ऑफ इंडिया8.85 ते 
10.75
10 लाख20 लाख40 लाख10-12
वर्ष
अॅक्सिस बँक13.70 ते
15.20
75 लाख75 लाख75 लाख7 वर्ष
आयडीबीआय बँक9.5010 लाख20 लाख10 लाख10 ते
15 वर्ष
कॅनरा बँक9.95 ते
10.70
10 लाख10 लाख20 लाख10 ते
15 वर्ष
युको बँक10.65 ते
11.00
10 लाख20 लाख10 लाख10-15 वर्ष
पंजाब नॅशनल बँक8.45 ते
11.05
10 लाख20 लाख15 लाख10-15 वर्ष
इंडियन बँक8.60 ते
10.65
15 लाख25 लाख10 लाख7 वर्ष



हेही वाचा -

२ पॅन कार्ड असल्यास भरावा लागेल 'इतका' दंड

सरकारी बँकांचा पुन्हा संप, 'या' ५ दिवशी कामकाज असेल ठप्प





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा