Advertisement

'या' बँकांनी दिली ईएमआय भरण्यास सवलत

सरकारी बँकांनी ग्राहकांना कर्जांचे हप्ते तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरून किंवा संदेश पाठवून सरकारी बँका याबाबत ग्राहकांना माहिती देत आहेत.

'या' बँकांनी दिली ईएमआय भरण्यास सवलत
SHARES

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी कर्जांचे हप्ते तीन महिने लांबणीवर टाकण्याची सुविधा देण्याचे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेने  सर्व बँकांना नुकतेच केले होते. त्यानंतर आता सरकारी बँकांनी ग्राहकांना कर्जांचे हप्ते तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरून किंवा संदेश पाठवून सरकारी बँका याबाबत ग्राहकांना माहिती देत आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया

एसबीआयने 1 मार्च, 2020 ते 31 मे 2020 पर्यंत भरण्यात येणारे ईएमआई तीन महीने पुढे ढकलले आहेत. बँकेने ट्टिटरवरून आपल्या ग्राहकांना ही माहिती दिली आहे.

पंजाब अॅण्ड सिंध बँक
पंजाब अॅण्ड सिंध बँकेने कर्जाचे हप्ते लांबणीवर टाकण्याची सूचना आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ग्राहकांना दिली आहे. मार्च, एप्रिल व मे या महिन्यांतील हप्ते तुमच्या कर्जखात्यातून लांबणीवर टाकण्यात आल्याचेही बँकेने जाहीर केले आहे.

आयडीबीआय बँक
आयडीबीआय बँकेनेही कर्जहप्ते लांबणीवर टाकण्यास मुभा दिली आहे. मात्र, ज्या ग्राहकांना कर्जांचे हप्ते कोरोनामुळे निर्माण झालेल्या रोकडटंचाईतही शक्य आहे, त्यांनी ते भरावेत, असे आवाहनही बँकेने केलं आहे.

कॅनरा बँक
१ मार्च ते ३१ मे या काळात येणारे कर्जांचे हप्ते लांबणीवर टाकत असल्याचे बँकेने ट्विटरवर सांगितले आहे. बँकेने याची माहिती ग्राहका्ंना एसएमएसद्वारेही दिली आहे. याशिवाय बँकेने स्वयंसहाय्यता गटांना २० लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्जही देऊ केले आहे.

आंध्र बँक
आंध्र बँकेने कर्जांचे तीन महिन्यांचे हप्ते लांबणीवर टाकण्याची सुविधा सुरू झाल्याचे @bank_andhra या आपल्या ट्विटर हॅण्डलवरून जाहीर केले आहे. याशिवाय क्रेडिट कार्डाची मार्च ते मे या तीन महिन्यांची थकित रक्कमही नंतर भरण्याची सुविधा देऊ केली आहे.

इंडियन बँक
तीन महिन्यांचे कर्जहप्ते लांबणीवर टाकण्याची सुविधा देत असल्याचे इंडियन बँकेने म्हटले आहे.

युको बँक
युको बँकेने कर्जहप्ते लांबणीवर टाकण्याची मुभा देत असल्याचे सांगतानाच त्यापुढील हप्ता जूनमध्ये भरायचा आहे असी आठवणही करून दिली आहे. तसेच लांबणीवर टाकल्यामुळे एकूण कर्जहप्त्यांचा कालावधी वाढले, याकडेही लक्ष वेधले आहे.

सिंडिकेट व इंडियन ओव्हरसीज बँक

सिंडिकेट बँकेने ट्विटर हॅण्डलवरून कोणत्या कर्जांचे हप्ते लांबणीवर टाकता येतील, ते सांगितले आहे. यामध्ये गृहकर्जे, वाहनकर्जे, एमएसएमई कर्जे यांच्यासह अन्य सर्व प्रकारच्या निश्चित मुदतीच्या कर्जांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेनेही ट्विटवरवरून कर्जहप्ते लांबणीवर टाकत असल्याचे सांगितले आहे.

वरील बँकांप्रमाणेच बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक यांनीही कर्जहप्ते लांबणीवर टाकण्याची योजना सुरू केल्याचे सांगितले आहे.


हेही वाचा -

महापालिकेकडून मुंबईतील 'इतकी' ठिकाणं सील

उपचारादरम्यान जसलोक रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा