Advertisement

लाॅकडाऊनचा जगातील अब्जाधीशांनाही फटका, संपत्तीत 'इतकी' मोठी घट

कोरोनामुळे संपूर्ण जगावर मंदीचं सावट आहे. याचा मोठा फटका जगातील अब्जाधीशांना बसला आहे.

लाॅकडाऊनचा जगातील अब्जाधीशांनाही फटका, संपत्तीत 'इतकी' मोठी घट
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील बहुतांशी देशात लाॅकडाऊन आहे. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनामुळे संपूर्ण जगावर मंदीचं सावट आहे. याचा मोठा फटका जगातील अब्जाधीशांना बसला आहे. अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.  फोर्ब्सने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीतून ही माहिती समोर आली आहे. 

फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, जगभरातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 8.7 ट्रिलियन डॉलरहून कमी होऊन 8 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे .तसंच भारतातील अब्जाधीशांची संख्या कमी झाली आहे. 2019 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या 106  होती. ही संख्या यावर्षी घटून 102 वर आली आहे. याशिवाय देशातील अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीतही 23 टक्के घट झाली आहे. त्यांची संपत्ती 313 बिलियन डॉलर इतकी झाली आहे.  

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी या 36.8 बिलियन डॉलर्ससह या यादीतील आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्सचे (डि-मार्ट सुपरमार्केट) संस्थापक राधाकृष्ण दमानी हे आहेत. 13.8 बिलियन डॉलरसह ते पहिल्यांदाच भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर, एचसीएल ग्रुपचे सहसंशतापक शिव नाडर 11.9 बिलियन डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

 फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या या यादीमध्ये भारतातून यावेळी पहिल्यांदाच BYJU लर्निंग अ‍ॅपचे संस्थापक रवींद्रन यांचाही समावेश झाला आहे. 1.8 बिलियन डॉलरच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये समावेश होणारे ते सर्वात तरुण भारतीय ठरले आहेत.



हेही वाचा -

कोरोनामुळे झोपडपट्ट्यांमधील मृत्यूचं प्रमाण ६० टक्के

लॉकडाऊनमुळं डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा