अवघे होऊ श्रीमंत !

 Pali Hill
अवघे होऊ श्रीमंत !

मुंबई- 'एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत' या ध्येयाने पछाडलेल्या 'सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट' या संस्थेने अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सामान्य माणसाने नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय करावा यासाठी सॅटर्डे क्लब तर्फे 'उद्योगबोध' या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहं. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे 13 आणि 14 जानेवारीला हा कार्यक्रम होणार आहे.

मराठी माणसाने उद्योगात यावेच आणि यशस्वी देखील व्हावे यासाठीचे मार्गदर्शन या कार्यक्रमात केले जाणार आहे. या कार्यक्रमाचं उद् घाटन शुक्रवारी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार आहे. या वेळी स्वामी काडसिद्धेश्वर, भरत दाभोळकर, संदीप कुलकर्णी आणि सयाजी शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. 'अंथरूण पाहून पाय पसरण्याचा काळ गेला, आता सामान्य माणसाने उद्योग क्षेत्रात जरूर उतरावे, यासाठीचे सर्वतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन करून सर्वांनी कसं यशस्वी व्हावे याचा गुरुमंत्र दिला जाईल, असं वक्तव्य सॅटर्डे क्लबचे सरचिटणीस नरेंद्र बागडे यांनी केलं.

Loading Comments