Advertisement

Coronavirus Updates: एपीएमसी मार्केट आठवड्यातील दोन दिवस बंद


Coronavirus Updates: एपीएमसी मार्केट आठवड्यातील दोन दिवस बंद
SHARES

वाशीतील एपीएमसी मार्केटला सद्या कोरोनोची धास्ती लागली. एपीएमसीतील गर्दी कमी करण्यासाठी व्यापारी प्रयत्न करत आहेत. यासाठी आता एपीएमसी गुरूवार आणि रविवार या दोन दिवशी एपीएमसी बंद करण्यात येणार आहे. तसंच होलसेल व्यापाऱ्यांनी ग्राहकांना एपीएमसीमध्ये न येता फोनवर ऑर्डर द्यावी अशी विनंती केली आहे. 

एपीएमसी ही आशियातील सर्वात मोठी  बाजारपेठ आहे. एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये रोज तब्बल 50 हजार लोकांची  ये-जा असते. येथील गर्दी 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी व्यापारी प्रयत्न करत आहेत. गर्दी कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिबंधक उपाय करण्यासाठी गुरूवार आणि रविवार या दोन दिवशी एपीएमसी बंद करून स्वच्छ करण्यात येणार आहे. मार्केटच्या गेटवर सॅनिटायजरच्या बॉटल ठेवण्यात येणार असून येणाऱ्या प्रत्येकाला मास्क किंवा रूमाल लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मुंबई,  नवी मुंबई,  कल्याण-डोंबिवली या भागातून हजारोच्या संख्येने किरकोळ व्यापारी एपीएमसी मार्केटमध्ये शेतीमाल खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र आता त्यांना मार्केटमध्ये न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्यापारी आपल्या टेम्पोने ग्राहकांपर्यंत त्यांचा माल पोहचविणार आहेत. शीघ्र नाशवंत माल असल्याने एपीएमसी मार्केट बंद ठेवणे शक्य नाही. बंद केल्यास शेतकरी वर्गाचे लाखोंचे नुकसान होवू शकते तर दुसरीकडे शहरातील ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू मिळणे दुरापास्त होण्याची शक्यता असल्याने एपीएमसी बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा