Advertisement

कोरोनाशी लढा देण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून भारताला १ अब्ज डाॅलर

भारताला हे कर्ज पुढील वर्षाच्या जूनअखेर दोन टप्प्यात मिळणार आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून भारताला १ अब्ज डाॅलर
SHARES

कोरोनाशी लढा देण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून भारताला १ अब्ज डाॅलर चं कर्ज मंजूर केलं आहे. या निधीतून सरकार स्थलांतरित मजूर, कोव्हीड योद्धे यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी खर्च केला जाणार आहे.  भारताला आर्थिक स्थैर्य, आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षेसाठी कर्ज देण्यात आले आहे.

भारताला हे कर्ज पुढील वर्षाच्या जूनअखेर दोन टप्प्यात मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५० दशलक्ष डॉलर येत्या जूनअखेर दिले जाईल. तर उर्वरित २५० दशलक्ष डॉलर जून २०२१ मध्ये भारताला दिले जाणार असल्याचं वर्ल्ड बँकेचे संचालक जुनैद अहमद यांनी सांगितलं. 

अहमद यांनी सांगितलं की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी अर्थसहाय्य करण्याबाबत सरकारशी चर्चा सुरु आहे. भारत सरकार कोरोनाच्या लढाईत योग्य दिशेने काम करत आहे. वर्ल्ड बँकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले जाणार आहे. या योजनेत गरिबांना मोफत अन्नधान्य वाटप, करोना योद्धयांना सामाजिक सुरक्षा, अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे यासारख्या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. 

मध्यम वर्ग आणि स्थलांतरित मजुरांना सध्या भेडसावणाऱ्या सामन्यांचे निराकरण करण्यासाठी हा निधी उपयोगी पडेल. करोना रोखण्याबाबतच्या उपाययोजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून वर्ल्ड बँक काम करेल, असे जुनैद अहमद यांनी सांगितले.



हेही वाचा -

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन? पण केंद्रानंतरच घोषणेची शक्यता

पोलिसांवर हल्ल्याच्या 218 गुन्हे, तर 770 जणांना अटक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा