Advertisement

२९ ऑगस्टपासून मुंबईतील पाणी कपात रद्द

पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं यानुसार २९ पासून महापालिका क्षेत्रात नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

२९ ऑगस्टपासून मुंबईतील पाणी कपात  रद्द
SHARES

मागील काही दिवसांत झालेल्‍या दमदार पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजता करण्‍यात आलेल्‍या मोजणीनुसार ७ ही तलावातील एकूण जलसाठा हा ९५.१९ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत लागू करण्‍यात आलेली पाणीकपात मागे घेण्‍याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये एकूण ३४ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, आता पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं यानुसार २९ पासून महापालिका क्षेत्रात नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. यंदाच्‍या पावसाळ्यादरम्‍यान जून व जुलै महिन्‍यात तलाव क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस झाला होता. परिणामी, जुलै अखेरीस तलावांमधील एकूण जलसाठा हा केवळ ३४ टक्‍के उपलब्‍ध असल्‍याने २० टक्‍के पाणीकपात लागू केली होती.

मुसळधार पावसामुळं तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे ४ तलाव भरून वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा आणि भातसा तलावही लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणं अपेक्षित आहे.

सकाळी ७ ही तलाव क्षेत्रात एकूण १३ लाख ७७ हजार ६९० दशलक्ष लिटर अर्थात ९५.१९ टक्‍के एवढा नोंदविण्‍यात आला आहे. आजच्‍याच दिवशी गेल्‍यावर्षी म्‍हणजेच २८ ऑगस्‍ट २०१९ रोजी तलाव क्षेत्रातील एकूण पाणीसाठा हा ९६.४३ टक्‍के इतका होता. तर २८ ऑगस्‍ट २०१८ रोजी एकूण जलसाठा हा ९४.८९ टक्‍के इतका होता.



हेही वाचा -

दादर, माहीम, धारावीत मलेरियाविरोधात महापालिकेची विशेष मोहीम

मुंबईत पावसाला सुरुवात, पुढच्या २४ तासासाठी हवामान खात्याचा इशारा


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा