Advertisement

तब्बल 10 व्या हंगामात सुटला रहिवाशांचा प्रश्न


तब्बल 10 व्या हंगामात सुटला रहिवाशांचा प्रश्न
SHARES

'ये दस साल आपके नाम' असं म्हणतं यंदा आयपीएल म्हणजे इंडियन प्रिमिअर लीगने दहा वर्ष पूर्ण केली आहेत. 2008 पासून सुरु झालेल्या आयपीएलच्या प्रत्येक हंगामाला क्रिकेट प्रेमींनी  भरभरून प्रतिसाद दिला आहे. मात्र आयपीएलचे काही सामने हे मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात आल्याने इथे राहणाऱ्या मरीन ड्राइव्हच्या डी रोडच्या रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. मात्र एएलमच्या माध्यामातून मरिन ड्राईव्ह रेसिडेंट असोसिएशने यावर मात केली आहे.

वानखेडे स्टेडिअमवर सामने पहायले येणारे मुंबईकर इथल्या 3 गेटचा प्रवेशासाठी वापर करतात. त्यामुळे येथे पार्किंग, फेरीवाले, ट्रॅफिकचा त्रास इथल्या रहिवाशांना सहन करावा लागत असे. विशेष म्हणजे जर या काळात कुणी आजारी पडलं तर, त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणं देखील इथल्या रहिवाशांना अडचणीचे होत असे. त्यातच स्टेडिअमच्या बाहेरील परिसरात कचऱ्याचेही ढिगारे साचलेले असायचे. मरिन ड्राइव्ह रेसिडेंट असोसिएशनने यासाठी एएलएमच्या माध्यमातून तब्बल 10 वर्ष लढा दिला आणि अखेर आता त्यांना थोडा का होईना, दिलासा मिळाला आहे.

असा होता या रहिवाशांचा खडतर प्रवास

वर्ष पहिले 2008 - आयपीएलच्या पहिल्या हंगामाला या वर्षांत सुरुवात झाल्याने खासगी सुरक्षा व्यवस्था, फेरीवाले, या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात इथल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असे

वर्ष 2009 - पहिल्या हंगामात झालेल्या त्रासामुळे दुसऱ्या हंगामाआधी मरिन ड्राइव्ह रेसिडेंट असोसिएशनने सरकारी यंत्रणा आणि आयपीएलच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला

वर्ष 2010 - पोलीस यंत्रणा आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने रहिवाशांची त्रासातून सुटका करण्यासाठी प्रयत्न केले.

वर्ष 2011 - कार पार्किंग आणि वॅलेट सिस्टीमची रहिवाशांकडून मागणी

वर्ष 2012 - रुग्णवाहिकेसह स्थानिकांच्या गाडीसाठी मार्ग सुकर झाला.

वर्ष 2013 - वॅलेट पार्किंगचा प्रश्न सुटला

वर्ष 2014 - आयपीएलचे सर्व भागिदार आणि मरिन ड्राइव्ह रेसिडेंट असोसिएशनची पहिली बैठक

वर्ष 2015 - परिसर स्वच्छ रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले.

वर्ष 2016 - फेरीवाल्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला गेला.

वर्ष 2017 - यावर्षी स्थानिकांना होणार त्रास थोडाफार कमी झाला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा