Advertisement

ताडदेव पोलिस वसाहत बनली धोकादायक


ताडदेव पोलिस वसाहत बनली धोकादायक
SHARES

ताडदेव पोलीस वसाहतीमधील १३ इमारती धोकादायक झाल्या असून इमारतीतील रहिवाशांनी वारंवार पीडब्लूडी विभागाकडे तक्रार करून दुरूस्तीची मागणी केली अाहे. मात्र, पीडब्लूडी विभाग याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा अारोप येथील पोलीस कर्मचारी रहिवाशांनी केला अाहे.  या इमारतींना बाहेरील बाजूने तडे गेले अाहेत.  इमारतींचे स्लॅब, बीम यांना देखील तडे गेले आहेत. याशिवाय पावसाळ्यात या इमारतींच्या शेवटच्या मजल्यावरील घरात ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे रहिवाशी त्रास सहन करावा लागत अाहे. 




७०० कुटुंबांचं वास्तव्य

ताडदेव पोलिस वसाहतीमध्ये पोलिसांच्या एकूण १३ इमारती आहेत. १९७१ साली या पोलिस वसाहतीमधील इमारतीचं बांधकाम करण्यात आलं असून १९७५ साली या इमारतींमध्ये रहिवाशी रहायला आले होते. या वसाहतीमध्ये  ७०० कुटुंबं राहत अाहेत. मात्र, अाता या इमारतींना ४० वर्ष पुर्ण झाली असून इमारती सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक झाल्या आहेत.


पीडब्लूडीकडून दखल नाही

या इमारतींचे स्लॅब, बीम, बाहेरील‌ भिंती यांना मोठे तडे गेले आहेत. तसंच, इमारतींमधील काही घरांमध्ये स्लॅब कोसळण्याच्या आणि घरातील पंखा कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये काही लोक जखमीही झाले असून रहिवाशांनी वारंवार पीडब्लूडी विभागाकडे याबाबत तक्रार केली अाहे. मात्र, पीडब्लूडीने इमारती दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा अारोप रहिवाशी करत अाहेत.


आम्ही वारंवार पीडब्लूडीकडे इमारतींच्या अवस्थेबाबत तक्रारी केल्या अाहेत.  पण त्यांच्याकडून तात्पुरतं डागडुजीकरण केलं जातं. कित्येक वेळा आमच्या समस्यांकडं दुर्लक्ष केलं जातं.
 - मुकेश भालेराव, सचिव



हेही वाचा -

तानसाही भरलं

मुंबईत २ लाखांहून अधिक उंदीर, घुशींचा खात्मा



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा