Advertisement

मुंबईत २ लाखांहून अधिक उंदीर, घुशींचा खात्मा


मुंबईत २ लाखांहून अधिक उंदीर, घुशींचा खात्मा
SHARES

लेप्टोस्पायरेसीसच्या आजारानं आतापर्यंत ४ जणांचे बळी गेले अाहेत. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसच्या प्रसारास कारणीभूत उंदीर व घुशींविरोधात आधीपासूनच महापालिकेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.  जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल २ लाख ११ हजार ७०५ उंदरांना जिवंत अथवा मृत पकडण्यात आल्याची आकडेवारी समोर अाली आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी १२०० उंदीर, घुशींवर नियंत्रण मिळवून त्यांचा खात्मा केला जात असल्याचं आढळून आलं आहे.



उंदरांमुळे लेप्टोस्पायरोसीस, प्लेग

उंदीर वा घुशींमुळे होणाऱ्या रोगांमध्ये लेप्टोस्पायरोसीस व प्लेग या रोगांचा प्रामुख्यानं समावेश आहे. लेप्टोस्पायरोसिस हा  'लेप्टोस्पायरा' (स्पायराकिटस) या सूक्ष्मजंतुमुळे होतो. हे सूक्ष्मजंतू उंदरांसह अनेक प्रकारच्या चतुष्पाद प्राण्याच्या मुत्राव्दारे जमिनीवर, अन्नपदार्थांवर अथवा पाण्यात मिसळले जातात. लेप्टोस्पायरोसिसने बाधित असलेल्या प्राण्याचे मलमूत्र माती, पाणी, अन्न, पेयजले इत्यादींच्या संपर्कात माणूस आल्यास जखमेव्दारे अथवा तोंडाव्दारे लेप्टोस्पायरोसीसचे जिवाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतात. तर ‘झिनॉपसिला चिओपिस’ या पिसवा उंदीर - घुशींच्या केसात आढळतात. या पिसवांमार्फत प्लेगची लागण होते.


महापालिकेकडून मूषक नियंत्रण

प्लेग, लेप्टोस्पायरोसिस यासारख्या रोगांच्या प्रसारास कारणीभूत उंदीर व घुशींचेही नियंत्रण महापालिकेकडून केले जात अाहे. महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत मूषक नियंत्रणाचे काम प्रामुख्याने ४ पद्धतीनं केलं जातं. उंदीर पकडण्यासाठी सापळे लावणे, विषारी गोळया टाकणे, बिळ्यांवर विषारी गोळ्यांनी वाफारणी करणे तसंच रात्रीच्या वेळी काठीने उंदीर मारणे या पद्धतींचा वापर केला जातो. या पध्दतींद्वारे जानेवारी ते जून २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण २ लाख ११ हजार ७०५ उंदरांचं नियंत्रण करण्यात आलं असल्याचं कीटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी स्पष्ट केलं.


उंदरांचं एवढं असतं आर्युमान

सस्तन प्राण्यामध्ये मोडणाऱ्या उंदीर वा घुशी यांचं आयुर्मान सुमारे १८ महिन्यांचं असतं. गर्भधारणेनंतर साधारणपणे २१ ते २२ दिवसांत मादी उंदीर आपल्या पिल्लांना जन्म देते. एका वेळेस साधारणपणे ५ ते १४ पिल्लांना ती जन्म देते. जन्मलेली पिल्ले ५ आठवडयात प्रजननक्षम होऊन ते देखील नव्या पिल्लांना जन्म देतात आणि याप्रकारे त्यांचा वंश कित्येक पटीत वाढत जातो. यानुसार साधारणपणे एक वर्षात उंदराच्या एका जोडीपासून अंदाजे १५ हजारांचा कुटुंब कबिला तयार होऊ शकतो.


अस्वच्छतेमुळं पैदास

शहरातील अनेक भागांमध्ये असलेला स्वच्छतेचा अभाव, उघडयावर अन्नपदार्थ विकणारे विक्रेते व कुठेही कचरा फेकण्याची अनेकांची सवय आणि त्यातून उंदरांना सहजपणे मिळणारं अन्न यामुळे उंदरांची संख्या वाढण्यास हातभारच लागतो. मूषक नियंत्रणासाठी स्वच्छतेविषयक जागरुकता असणं, हा अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. अतिशय स्वच्छ ठेवलेल्या गृहनिर्माण सोसायटीत देखील आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असल्यामुळे उंदराचा उपद्रव आढळून येत असल्याचं किटकनाशक खात्याचे प्रमुख अधिकारी राजन नारिग्रेकर यांनी सांगितलं.


उंदीर का कुरतडतात

 उंदीर मोठ्या प्रमाणात नासधूस देखील करत असतात. उंदरांचे पुढचे दात (Incisor teeth) सतत वाढत असतात. सतत वाढणाऱ्या या दातांची झीज व्हावी व ते नियंत्रणात असावेत, याकरिता उंदीर कायम कुठल्यातरी वस्तू कुरतडत असतात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तूंची नासधूस होऊन आपल्याला अनेकदा आर्थिक नुकसानदेखील सहन करावं लागतं. यामुळेच मोठ्या प्रमाणात असणारा उंदरांचा प्रजननदर, उंदरांमुळे होणारा संभाव्य रोग प्रसार आणि उंदरांमुळे होणारी नासधूस थांबावी, यासाठी प्रभावी 'मूषक नियंत्रण' अत्यंत आवश्यक आहे.


रोखण्यासाठी उपाय

उंदरांचा घरात प्रवेश होऊ नये याची खबरदारी घेणे, उंदरांना आसरा मिळणार नाही, उंदरांना खाद्य मिळणार नाही याची दक्षता घेणे, उंदरांना मारणे अादी उपाय उंदीर रोखण्यासाठी करणे अावश्यक अाहे.

सर्वाधिक उंदीर असलेले पाच प्रभाग


  • एम/पूर्व (गोवंडी, देवनार, शिवाजीनगर परिसर)  : ३२ हजार ९३५
  • ई विभाग (भायखळा, नागपाडा)                    : २३ हजार ७६२
  • एन विभाग ( घाटकोपर)                              : २३ हजार ६८५
  • ए विभाग  (फोर्ट, नरिमन पॉईंट)                    : २३ हजार २५२
  • डी विभाग ( ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल)                 : १८ हजार ४६३



हेही वाचा -

दुधाच्या टँकरला पोलिसांचं संरक्षण

दूधकाेंडी आंदोलन गुजरातच्या सीमेवर, २५ टँकर अडवले



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा